पोटासंबंधी समस्या; मिश्रडाळीच्या सेवनाने होईल फायदा

पोटासंबंधी समस्या; मिश्रडाळीच्या सेवनाने होईल फायदा

पचन ठिक नसेल, पित्त, वात, आणि बद्धकोष्ठता असेल तर महाडाळ खाणे चांगले.

  • Last Updated: Jul 24, 2020 11:29 PM IST
  • Share this:

डाळ भारतीय भोजनात सगळ्यांना आवडते . भाज्या असतातच पण डाळी जेवणाचा आनंद द्विगुणित करतात. त्या पोषक असतात म्हणून त्या दैनंदिन आहारात असायलाच हव्यात. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, डाळ शिजल्यानंतरही त्यातील पोषकता अबाधित राहते, हे  डाळींचे वैशिष्ट्य हे आहे. फक्त डाळीची प्रकृती बघून त्या खाण्याचा सल्ला दिला जातो. लोकांच्या मनात गोंधळ असतो की कुठल्या हंगामात कुठली डाळ खावी. जर पचन ठीक नसेल, पित्त, वात, आणि बद्धकोष्ठता असेल तर महाडाळ खाणे चांगले.

महाडाळ

मूग आणि मसुरीची डाळ एकत्र करून महाडाळ किंवा मिश्रडाळ बनते. ही मिश्रडाळ शरीराला नुकसान करत नाही आणि पचन सुधारते. मूग आणि मसुरीची डाळ जास्त उष्ण आणि जास्त थंडही नसते, म्हणून या दोन्ही डाळी एकत्र करून खाणे चांगले. जर अशी डाळ थंडीच्या दिवसात खाल्ली तर ती उष्णता देते, आणि गरमीच्या दिवसात खाल्ली तर थंडावा देते. जर त्या स्वतंत्रपणे खाल्ल्या तर त्या त्यांच्या गुणधर्मानुसार फायदा देतात.

आजारपणातून उठल्यानंतर डॉक्टर नेहमी मसुरीची डाळ खाण्याचा सल्ला देतात. कारण ती डाळ शरीराला मजबुती आणि ऊर्जा देते.

मूग आणि मसुरीचे गुण

मूग आणि मसूर डाळीचे आपले स्वतंत्र औषधी गुण आहेत. मुगाच्या डाळीची प्रकृती थंड आहे, तर अख्खे मूग उष्ण असतात. म्हणजेच डाळीचे गुणधर्म डाळ बनवण्याच्या प्रक्रियेत परिवर्तीत होतातहे आश्चर्यजनक आहे. त्याचप्रमाणे महाडाळ या विशेष गुणांमुळे आरोग्यासाठी लाभदायक आहे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, मूग डाळीत प्रथिने, तंतुमय पदार्थ, अँटीऑक्सिडंट्स , मॅगनीज, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, जस्त आणि जीवनसत्त्व बी असते.

प्रथिनांची अॅलर्जी असली तरी खाऊ शकतात मिश्र डाळी

काही लोकांना प्रथिनेयुक्त आहाराची एलर्जी असते, पण शरीराला प्रथिने लागतात. मग लोक प्रथिनांच्या गोळ्या घेतात. त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यांनी महाडाळ खावी, त्या डाळीच्या गुणधर्मामुळे त्यांना फायदा होतो आणि कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - जवस: फायदे, वापर, सहप्रभाव आणि मात्रा

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 24, 2020, 11:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading