मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'या' आजारामुळे वाढतंय मिस यूनिव्हर्स हरनाझ संधूचं वजन, वाचा किती धोकादायक

'या' आजारामुळे वाढतंय मिस यूनिव्हर्स हरनाझ संधूचं वजन, वाचा किती धोकादायक

नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाझने रॅम्प वॉक केला.

नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाझने रॅम्प वॉक केला.

नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाझने रॅम्प वॉक केला. या इव्हेंटमधून समोर आलेले फोटो आणि व्हिडिओमध्ये तिचे वजन वाढलेले दिसत आहे. यावरून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी : मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आहे. नुकतेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये हरनाझने रॅम्प वॉक केला. या इव्हेंटमधून समोर आलेले फोटो आणि व्हिडिओमध्ये तिचे वजन वाढलेले दिसत आहे. यावरून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. तिच्या वाढलेल्या वजनामुळे काही तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. यानंतर हरनाझ संधूने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत वजन वाढण्यामागील कारण सांगितले आहे.

ब्युटी क्वीन हरनाझ संधू सध्या भारतात असून अनेक पार्ट्यामध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ती सतत आपली उपस्थिती नोंदवत आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह दिसते. हरनाझ दैनंदिन दिनचर्यानुसार तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अशात समोर आलेल्या तिच्या काही फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे. यात तिचे वजन वाढलेले दिसत आहे.

हे पदार्थ खाऊन झपाट्याने वाढवा हिमोग्लोबिनची पातळी, अशक्तपणा होईल दूर

सेलिअ‍ॅक रोगाने ग्रस्त आहे हरनाज

पीटीआयशी बोलताना हरनाझ संधूने सांगितले की ती सेलिअ‍ॅक रोगाने ग्रस्त आहे. ग्लूटेन गहू, बार्ली आणि मोहरीमध्ये आढळणारे प्रोटीनची तिला अ‍ॅलर्जी आहे. या ग्लुटेन अ‍ॅलर्जीमुळे तिचे वजन वाढत वाढले आहे. हरनाझने सांगितले की, तिला हा आजार जन्मापासून आहे. या आजारामुळे हरनाझला गव्हाच्या पिठाची चपाती देखील खाण्यास मनाई आहे. हे लक्षात घ्या की सेलिअ‍ॅक रोगात शरीर ग्लूटेन पचवू शकत नाही, त्यामुळे आतड्याचे नुकसान होते. जागतिक स्तरावर हा आजार 100 पैकी एका व्यक्तीला होतो.

सेलिअ‍ॅक रोग किती धोकादायक?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सेलिअ‍ॅक रोगात आतड्यांचे नुकसान होते. त्यामुळे अतिसार, थकवा, वजन कमी होणे, शरीरावर सूज येणे आणि अशक्तपणा असे गंभीर आजार होऊ शकतात. लहान मुलांना हा आजार असेल तर त्याचा त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच हा रोग आनुवंशिक आहे आणि पालकांकडून मुलांना होण्याची शक्यता 10 पैकी 1 अशी असते. वेळेवर उपचार न घेतल्यास सेलिअ‍ॅक रोग टाइप 1 मधुमेह आणि मल्टीपल क्लेरोसिस अशा अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. याशिवाय सेलअ‍ॅक रोग असलेल्या लोकांना कोरोनरी धमनी रोग होण्याचा धोका दुप्पट असतो. या आजारामुळे लहान आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका चार पटीने जास्त असतो.

सेलिअ‍ॅक रोगाची लक्षणे

सेलिअ‍ॅक रोगाची लक्षणे मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये भिन्न असतात. जरी काही पाचक लक्षणे समान आहेत. अतिसार, थकवा, वजन कमी होणे, शरीरावर सूज येणे आणि गॅसची समस्या, पोटदुखी, मळमळ आणि उलटी, बद्धकोष्ठता या प्रमुख लक्षणांसह सेलिआक रोगाची इतरही काही लक्षणे आहेत. यात अ‍ॅनिमिया, हाडांची घनता कमी होणे किंवा हाड कमकुवत होणे, त्वचेवर खाज सुटणे, फोड येणे, पुरळ येणे, डोकेदुखी आणि थकवा, मज्जासंस्थेला इजा आणि सांधे दुखी ही देखील सेलिअ‍ॅक रोगाची लक्षणे आहेत.

Food Combination : पालक पनीर खरंच आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे का? मोठा गैरसमज होईल दूर

उपचार काय आहेत?

या आजारावर कायमस्वरूपी उपचार नाही. परंतु सेलिअ‍ॅक डिसीज फाउंडेशनच्या मते, सेलिअ‍ॅक रोगावर आयुष्यभर ग्लूटेन-मुक्त आहाराचे काटेकोरपणे पालन करणे हा एकमेवर उपचार आहे. ज्या लोकांना हा आजार आहे त्यांनी गहू, मोहरी, बार्ली, पिठाची भाकरी आणि बिअरपासून दूर राहावे. हा आजार असलेले लोक फळे, भाज्या, मांस आणि चिकन, मासे, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, नट आणि ग्लूटेन मुक्त गोष्टी खाऊ शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle