फक्त आवाजावरून ओळखतो व्यक्ती; अंधत्वावर मात केलेल्या टेलिफोन ऑपरेटरचे मंत्रीही झाले फॅन

फक्त आवाजावरून ओळखतो व्यक्ती; अंधत्वावर मात केलेल्या टेलिफोन ऑपरेटरचे मंत्रीही झाले फॅन

जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनीदेखील या टेलिफोन ऑपरेटरचं (telephone operator) कौतुक केलं आहे.

  • Share this:

सांगली, 05 ऑक्टोबर : अनेकदा आपण फोनवर ज्या व्यक्तीशी नेहमी बोलतो त्या व्यक्तीचा आवाजही आपल्याला ओळखता येत नाही. आवाज तर दूर कित्येक वेळा तर एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटल्यानंतरही ती व्यक्ती आपल्या लक्षात राहत नाही. अशात एखादं सरकारी कार्यालय म्हणजे दिवसभरात किती फोन येत असतील याची कल्पना आपण करूच शकतो आणि तरीदेखील सरकारी कार्यालयातील एक टेलिफोन ऑपरेटर (telephone operator) फक्त आवाजावरून समोरच्या व्यक्तीला ओळखतो. या टेलिफोन ऑपरेटरचे जलसंपदामंत्री जयंत पाटीलही (Jayant Patil) फॅन झाले आहेत.

जलसंपदा विभागात काम करणारे सांगलीतील सुलेमान गैबी पटेल. फक्त एक टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. तुमच्या आमच्यासाठी त्यांचं हे पद सामान्य वाटत असलं, तरी त्यांच्याकडे जे कौशल्य आहे ते कदाचित आपल्यापैकी कुणाकडेच नाही. सुलेमान फक्त आवाजावरूनच समोरच्या व्यक्ती ओळखतात. अंधत्वावर मात करत गेली कित्येक वर्षे ते जलसंपदा विभागात काम करत आहेत.

सुलेमान यांच्या कौशल्याची दखल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी घेतली. सुलेमान यांच्या या कौशल्याचं जयंत पाटील यांनी कौतुक केलं. आपल्या सोशल मीडियावर त्यांनी सुलेमान यांच्याबाबत पोस्ट केली आहे. असे कर्तव्यदक्ष लोक जलसंपदा खात्यात कार्यरत आहेत याबाबत जयंत पाटील यांनी समाधानही व्यक्त केलं आहे.

हे वाचा - शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून LGBT सेलची स्थापना, ठऱला देशातील पहिलाच पक्ष

टेलिफोन ऑपरेटर  म्हटलं की त्याचं काय इतकं मोठं काम, अशीच प्रतिक्रिया आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांची असते. मात्र सुलेमानसारखा टेलिफोन ऑपरेटर पाहिल्यानंतर आता तुम्हालाही त्याचं कौतुक वाटलं असेल. शिवाय सरकारी कार्यालय आणि तिथला कर्मचारी यांच्याबाबत आपल्या मनात एक पक्कं चित्र तयार झालं आहे. पण त्याला अपवाद ठरलेत ते सुलेमान. त्यामुळे सुलेमानसारखाच कर्तव्यदक्ष कर्मचारी प्रत्येक सरकारी विभागात, कार्यालयात असं तुम्हालाही नक्की वाटत असेल.

Published by: Priya Lad
First published: October 5, 2020, 7:04 PM IST

ताज्या बातम्या