मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Businessman : अनेक रेस्टॉरंट्सचा मालक झाला कंगाल; मात्र कर्ज फेडण्यासाठी जिद्दीने रस्त्याशेजारी सुरू केला स्टॉल

Businessman : अनेक रेस्टॉरंट्सचा मालक झाला कंगाल; मात्र कर्ज फेडण्यासाठी जिद्दीने रस्त्याशेजारी सुरू केला स्टॉल

 चिनी सोशल मीडियावर सध्या एका कोट्यधीश उद्योगपतीची खूप चर्चा होत आहे.

चिनी सोशल मीडियावर सध्या एका कोट्यधीश उद्योगपतीची खूप चर्चा होत आहे.

चिनी सोशल मीडियावर सध्या एका कोट्यधीश उद्योगपतीची खूप चर्चा होत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : चिनी सोशल मीडियावर सध्या एका कोट्यधीश उद्योगपतीची खूप चर्चा होत आहे. एके काळी चीनमध्ये रेस्टॉरंट्सची चेन चालवत असलेल्या या उद्योगपतीला आता दिवाळखोरीला सामोरं जावं लागलं आहे. त्याने घर, गाड्या, रेस्टॉरंट्स हे सगळं विकलं. तरीही 52 कोटी रुपयांचं कर्ज अद्याप बाकी आहे. त्यासाठी त्याने स्वतः एक स्टॉल सुरू करून त्यातून पैसा उभा करण्याचा विचार केला आहे. पुन्हा पैसे कमावण्याच्या त्याच्या जिद्दीमुळे सोशल मीडियावर त्याची भरपूर चर्चा होते आहे. 'आज तक'ने त्याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे.

चीनमधला एक मोठा व्यावसायिक सध्या दिवाळखोर झाला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, 52 वर्षांचे तांग जियान काही वर्षांपूर्वी यशस्वी उद्योजक होते. रेस्टॉरंट्सची चेन त्यांच्या मालकीची होती. अवघ्या 36 वर्षांच्या वयात त्यांनी कोट्यवधींची संपत्ती जमवली होती; मात्र लक्ष्मी त्यांच्यावर फार काळ प्रसन्न राहिली नाही. 2005मध्ये त्यांच्या नशिबाचे फासे उलटे पडले. ज्या व्यवसायाची त्यांना फारशी माहिती नव्हती, त्यात त्यांनी त्यांचा पैसा गुंतवला.

हे ही वाचा : #कायद्याचंबोला : वाहन चोरीनंतर विमा कंपनीने क्लेम नाकारला तर...; प्रत्येकाला माहिती हवी ही प्रक्रिया

अनेकांनी त्यांना इतकी मोठी रक्कम त्यात न गुंतवण्याचा सल्ला दिला होता; मात्र त्यांनी लँडस्केप इंजिनीअरिंगच्या व्यवसायात भरपूर पैसा गुंतवला. त्यात त्यांचं भरपूर नुकसान झालं. त्यांचा निर्णय चुकला. पाहता पाहता त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली. रेस्टॉरंट्सही बंद पडली आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर चढला.

कर्ज फेडण्यासाठी तांग यांनी त्यांची घरं, गाड्या आणि रेस्टॉरंट्सही विकली. तरीही त्यांच्यावर अद्याप 52 कोटी रुपयांचं कर्ज आहेच. इतकी मोठी रक्कम फेडण्यासाठी आता त्यांनी स्वतःच स्टॉलवर काम करायला सुरुवात केलीय. रस्त्याच्या कडेला त्यांनी एक स्टॉल सुरू केलाय. त्यात ते स्वतः काम करतात. त्यांच्या मते, प्रत्येकाच्या आयुष्यात काही संकटं येतात, कठीण परिस्थिती येते; मात्र तरीही आपण हार मानायची नाही.

हे ही वाचा : वाढत्या गरजांना आताच आवर घाला नाहीतर...; वाचा आजचं आर्थिक राशिभविष्य

कर्ज फेडण्याबाबत काहीच नियोजन नव्हतं; मात्र ते एक दिवस नक्की फेडलं जाईल हा विश्वास होता, असंही ते म्हणतात. ‘संकटांचा सामना शांत डोक्यानं आणि धैर्यानं करत पुढे गेलं पाहिजे,’ असं तांग जियान म्हणतात.

एके काळी कोट्यधीश असलेले तांग जियान हे चिनी उद्योगपती आता रस्त्याच्या कडेला एका स्टॉलवर ग्रील्ड सॉसेज विकतात. भरपूर संपत्तीचा मालक आता दिवाळखोर झाला असला, तरी त्यांनी जिद्द सोडली नाही. जन्मावेळी आपण रिकाम्या हातानंच इथं येतो, त्यामुळे काही गमावण्याचं दुःख वाटून घेऊ नका. आयुष्यात सतत काही ना काही ध्येय ठेवा, असं ते सांगतात. चीनच्या सोशल मीडियावर सध्या त्यांची खूप चर्चा होते आहे.

First published:

Tags: Business, Business News, China, Small business