दररोज दूध पिताय सावधान ! हाडं मजबूत ठेवणाऱ्या दुधामुळे होतोय जीवघेणा आजार, धक्कादायक संशोधन

गरम दुधात जायफळ टाकून ते झोपण्याआधी घेतल्यास झोप चांगली लागू शकते. त्याचबरोबर तुपात जायफळ घासून डोळ्यांच्या वर लावल्यास झोप चांगली लागू शकतो.

दररोज दूध (Milk) पिणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा (Breast cancer) धोका 80 टक्क्यांनी वाढतो, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

  • Share this:
    कॅलिफोर्निया, 29 फेब्रुवारी :  जसजसं वय वाढतं, तसतसं हाडं ठिसूळ होत जातात, पुरुषांच्या तुलनेत महिलांना हाडांच्या सर्वाधिक समस्या जास्त बळावतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारातून कॅल्शिअम जास्तीत जास्त घ्यायला हवं आणि कॅल्शिअमचा सर्वात उत्तम स्रोत म्हणजे दूध (Milk). त्यामुळे महिलांनी नियमित दूध प्यावं असं म्हटलं जातं. मात्र आता महिलांच्या हाडांना मजबुती देणारं हे दूध कॅन्सरला (Cancer) कारणीभूत ठरतं आहे. नियमित दूध पिणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा (Breast cancer) धोका असतो, अशी धक्कादायक बाब संशोधनात समोर आली आहे. अमेरिकेतल्या लोमा लिंडा युनिव्हर्सिटीतल्या (Loma Linda University) संशोधकांनी हा अभ्यास केला. दररोज दूध पिणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 80 टक्क्यांनी वाढतो, असं या संधोधनात दिसून आलं. इंटरनॅशनल जर्नल ऑफ इपिडेमोलॉजीमध्ये (International Journal of Epidemiology) हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हेदेखील वाचा - एकापेक्षा दुसऱ्या Breast चा आकार मोठा, Cancer चं लक्षण तर नाही ना? उत्तर अमेरिकेतील 53 हजार महिलांचा तब्बल 8 वर्ष अभ्यास करण्यात आला. त्यांचा आहार, व्यायाम, अल्कोहोलचं सेवन, कुटुंबात कुणाला ब्रेस्ट कॅन्सर होता का, हार्मोन्ससंबंधित समस्या, कोणतीही औषधं तर घेत नाहीत नाही, इतर समस्या किंवा आजार या सर्वाबाबत जाणून घेण्यात आलं. अभ्यासाच्या सुरुवातीला या महिलांना ब्रेस्ट कॅन्सर नव्हता. मात्र अभ्यासाच्या शेवटी तब्बल 1100 महिलांना ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं निदान झालं. संशोधनानुसार, दररोज फक्त 250 मिली म्हणजे एक कप दूध प्यायल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 50 टक्क्यांनी वाढू शकतो ज्या महिला 2 ते 3 कप दूध पितात त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 70 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढतो. फूल फॅट मिल्क, लो फॅट मिल्कर आणि नो फॅट मिल्क तिन्ही प्रकारच्या दुधाच्या सेवनाने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. हेदेखील वाचा - पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ कॅन्सरचा सर्वाधिक धोका, लक्षणांबाबत माहिती असू द्या संशोधनाचे अभ्यास गॅरी ई फ्रेजर (Gary E. Fraser) यांनी सांगितलं की, "दररोज दूध प्यायल्याने किंवा दुधात एखादा असं घटक असल्याने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कित्येक पटीनं वाढतो, याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत" हे संशोधन फक्त निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे दूध प्यायल्याने कॅन्सर का होतो, याचं कारण या अभ्यासात स्पष्ट नाही झालं. मात्र गायीच्या दुधात असे हार्मोन्स आहेत, जे ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत ठरत असावेत, असं मत शास्त्रज्ञांनी मांडलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको सध्या अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर दिसून येतो. आकडेवारीनुसार भारतात 8 पैकी एक महिला ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त आहे. त्यामुळे वेळोवेळी ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करायला हवी. त्याच्या लक्षणांबाबत माहिती करायला हवी, ब्रेस्टच्या त्वचेमध्ये बदल, आकार आणि रंग बदलणं, निपलमध्ये बदल जाणवणे, स्तनांमध्ये गाठ जाणवणे, ब्रेस्टमधून दुधाशिवाय इतर स्राव येणं, ब्रेस्टला सूज येणं, खाज येणं अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करून घ्या.
    First published: