Home /News /lifestyle /

NUDE PHOTO वरून झाला ट्रोल; आता मिलिंद सोमणनं शेअर केला नवा VIDEO

NUDE PHOTO वरून झाला ट्रोल; आता मिलिंद सोमणनं शेअर केला नवा VIDEO

गोव्यात NUDE PHOTO शूट केल्यानंतर मिलिंद सोमणविरोधात (Milind soman) पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल करण्यात आली आहे.

  मुंबई, 09 नोव्हेंबर : अभिनेता मिलिंद सोमण (Milind soman) फिटनेस आयकॉन मानला जातो. सोशल मीडियावर (social media) शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे तो नेहमी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्यानं आपला न्यूड फोटो (nude photo) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आणि तो अडचणी सापडला. सोशल मीडियावर त्याला ट्रोल केलं जाऊ लागलं, पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही नोंदवण्यात आली. या फोटोचा वाद कायम असताना मिलिंदने आता आपला आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. मिलिंद सोमणनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शर्टलेस होऊन शीर्षासन करताना दिसतो आहे. या व्हिडीओसह त्यानं कॅप्शनमध्ये स्माइल इमोजी टाकलं आहे आणि म्हटलं, उलटं झाल्याशिवाय काही सरळ होत नाही.
  मिलिंदची पत्नी अंकिताने हा व्हिडीओ फोटो शूट केला आहे. मिलिंदच्या या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. हे वाचा - आणखी एक सुपरस्टार कोरोना पॉझिटिव्ह; 2 दिवसांपूर्वीच घेतली होती CM यांची भेट मिलिंदनं आपल्या 55 व्या वाढदिवशी गोव्याच्या बीचवर न्यूड रनिंग केलं होतं. हा फोटो त्यानं आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर गोव्याच्या वास्को पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आईटी अॅक्ट अंतर्गत आईपीसी कलम 294 आणि  67 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. हे वाचा - Birthday Special: त्या कठीण प्रसंगामुळे जीवनच बदललं-सुबोध भावेच्या संघर्षाची कथा मिलिंद सोमनचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच गोवा सुरक्षा मंचने वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाकल केला. मिलिंदचा हा फोटो गोव्याची प्रतिमा आणि संस्कृतीचा अपमान करणारा आहे. या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या