असा फिट राहतो मिलिंद सोमण, चाहत्यांना VIDEO तून दिल्या टिप्स

असा फिट राहतो मिलिंद सोमण, चाहत्यांना VIDEO तून दिल्या टिप्स

आपणही फिट राहायचं असा विचार करत असलेल्यांसाठी मिलिंद सोमणने (Milind soman) फिटनेस (Fitness) मंत्रा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : अभिनेता आणि सुपर मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman)  म्हणजे एक फिटनेस (fitness) आयकॉन. वाढत्या वयातही एखाद्या तरुणाला लाजवेल असा त्याचा फिटनेस आहे. फक्त स्वत:च नाही तर चाहत्यांनाही तो फिटनेस मंत्रा देत असतो. सोशल मीडियावरून आपले फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत इतरांनाही तो फिटनेस टिप्स देतो.

मिलिंद सोमण याने नुकताच असा आपला फिटनेस व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पुशअप्स करताना दिसतो आहे. या व्हिडीओसह त्याने फिटनेससाठी प्रयत्न करणाऱ्यांना काही सल्लादेखील दिला आहे आणि इतरांना प्रोत्साहीत केलं आहे.

फिट राहणं तसं कठीण नाही, असं म्हणत मिलिंदने पोस्टमध्ये टप्प्याटप्प्याने माहिती दिली आहे.

सर्वात आधी तुम्हाला कसं आणि का फिट राहायचं आहे ते ठरवा.

तुम्ही जे लक्ष्य गाठण्यासाठी हे करत आहात त्यातून तुम्हालाही आनंद मिळतो आहे ना, ते सुनिश्चित करा.

तुम्ही ठरवलेलं लक्ष्य गाठण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा. यासाठी तुम्ही गुगलचीही मदत घेऊ शकता.

हे वाचा - मानसिक समस्येचा सामना करतेय ही अभिनेत्री; कशी देतेय लढा पाहा VIDEO

सुरुवातीला छोटं पाऊल उचला, मग आणखी एक छोटं पाऊल आणि मग हळूहळू पावलं टाकत जा, जोपर्यंत तुम्हाला करायचं आहे, तोपर्यंत असंच करत राहा.

छोट्या छोट्या पावलांवरच भर द्या. प्रत्येक स्टेप सहज सोप्या पद्धतीने करा.

दिवसाल फक्त 5 मिनिटंही  यासाठी दिली तरी भरपूर आहेत.

विशेष म्हणजे फक्त मिलिंद सोमणचं नाही तर त्याची आईदेखील वयाच्या 81 व्या वर्षीही इतकी फिट आहे की, पाहून आश्चर्य आणि कौतुकचं वाटेल. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या आईच्या वाढदिवशी आईचा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता.

मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोरवारही फिटनेट बाबत खूप आग्रही आहे. कोणत्याही फिटनेस इव्हेंटला हे दोघं एकत्र दिसतात. शिवाय मिलिंद सोमणची पत्नी आणि आई दोघंही अशा पद्धतीने एक्सरसाइज करताना दिसले. सासू-सूनेच्या वयात इतका फरक आहे, तरी फिटनेसबाबत मात्र त्या दोघीही एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत.

संपादन - प्रिया लाड

Published by: Priya Lad
First published: July 10, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या