प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्ट कंपनीने दिली IIT’s ना दीड कोटींची ऑफर

पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटची प्रक्रिया दोन आठवडे चालणार आहे. यावेळी १६५० विद्यार्थ्यांनी आयआयटी बीमध्ये प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे.

  • Share this:

देशातील प्रतिष्ठीत कॉलेजमधील एक इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्लेसमेंटची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या टप्यातच कंपन्या विद्यार्थ्यांवर पैशांचा पाऊस पाडत आहे. कंपन्या त्यांना एक कोटीपेक्षाही जास्तीचं वार्षिक पॅकेज देत नोकरी देत आहे. यावर्षी सर्वात जास्त पॅकेजची नोकरी देण्यात मायक्रोसॉफ्ट आणि उबर कंपनी अग्रणी आहे.

या प्लेसमेंट सीझनमध्ये आयआयटीमध्ये सर्वात जास्त पगार देणारी कंपनी मायक्रोसॉफ्ट ठरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्टने १.५ कोटी रुपयांचा सर्वात जास्त पगार ऑफर केला आहे. याआधीही मायक्रोसॉफ्टने मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत.

मायक्रोसॉफ्टनंतर सर्वात जास्त पगार देणाऱ्या कंपनीत दुसऱ्या स्थानावर कॅब कंपनी उबरच आहे. उबर कंपनीनेही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना १ कोटींपेक्षा जास्तीचं पॅकेज ऑफर दिली आहे. आतापर्यंत या दोन कपंन्यांनी १ कोटीपेक्षा जास्तीचे पॅकेज विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत.

देशातील वेगवेगळ्या भागातील आयआयटी कॅम्पसमध्ये प्लेसमेंट सीझन १ डिसेंबरपासून सुरू झाला आहे. हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने एका विद्यार्थ्याला सर्वात जास्त म्हणजे १.३९ कोटी पॅकेजची नोकरी दिली होती. यानंतर उबरने ९९.८७ लाख पॅकेज देऊन एका विद्यार्थ्याला नोकरी दिली होती.

पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटची प्रक्रिया दोन आठवडे चालणार आहे.  आतापर्यंतच सर्वात जास्त पॅकेज २०१५- १६ ओरॅकलने २ कोटी २७ लाखांचं पॅकेज एका विद्यार्थ्याला दिले होते. यावेळी १६५० विद्यार्थ्यांनी आयआयटी बीमध्ये प्लेसमेंटसाठी नोंदणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 07:31 PM IST

ताज्या बातम्या