Home /News /lifestyle /

'योग योगेश्वर जयशंकर' मालिकेच्या शुटींगला सुरुवात; छोटे शंकर महाराज, पार्वतीबाई अन् चिमणाजींचा लुक आला समोर

'योग योगेश्वर जयशंकर' मालिकेच्या शुटींगला सुरुवात; छोटे शंकर महाराज, पार्वतीबाई अन् चिमणाजींचा लुक आला समोर

'योग योगेश्वर जयशंकर' मालिकेच्या शुटींगला सुरुवात; छोटे शंकर महाराज, पार्वतीबाई अन् चिमणाजींचा लुक आला समोर

'योग योगेश्वर जयशंकर' मालिकेच्या शुटींगला सुरुवात; छोटे शंकर महाराज, पार्वतीबाई अन् चिमणाजींचा लुक आला समोर

महादेवाचा अंश असलेल्या योग योगेश्वर जयशंकर यांचा जीवनप्रवास मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. ही मालिका 30 मे पासून कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

    मुंबई, 25 मे:  टेलिव्हिजनवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच नव्या मलिकांमध्ये 'योग योगेश्वर जयशंकर' (Yog Yogeshwar Jaishankar)  या मालिकेची चर्चा आहे. महादेवाचा अंश असलेल्या योग योगेश्वर जयशंकर यांचा जीवनप्रवास  मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. ही मालिका 30 मे पासून कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती.  शंकर महाराजांच्या भक्तांसाठी खास माहिती म्हणजे मालिकेच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. (Yog Yogeshwar Jaishankar' series shooting  start) मालिकेच्या सेटवरील काही व्हिडीओ राजश्री मराठीने शेअर केले आहेत. मालिकेत पहिल्यांदा छोटे शंकर महाराज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. छोट्या शंकर महाराजांना घेऊन मालिकेच्या टीमने शुटींगला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये योग योगेश्वर जय शंकर मालिकेतिल 'छोटे शंकर महाराज', 'पार्वतीबाई', आणि 'चिमणाजी' दिसत आहेत. छोट्या शंकर महाराजांच्या भूमिकेत बालकलाकार 'आरुष बेडेकर' (Arush Bedekar) दिसत आहे. तर  पार्वती बाईंच्या भूमिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) आहे आणि चिमणाजी यांच्या भूमिकेत अतुल आगलावे (Atul Aaglave)  दिसत आहे.  त्याचप्रमाणे शंकर महाराजांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता चिन्मय उद्गीरकर (Chinmay Udgirkar) दिसणार आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या मुहुर्तासाठी मालिकेतील सर्व कलाकार एकत्र आले होते. त्यांनी सेटवर शंकर महाराजांची पूजा करुन शुटींगला सुरुवात केली. हेही वाचा - सोनाली कुलकर्णीनंतर 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनंही केलं दुसरं लग्न, हातावरच्या मेहंदीनं वेधलं लक्ष
    योग योगेश्वर मालिकेसाठी अभिनेता चिन्मय उद्गीरकरने विशेष मेहनत घेतली असून त्याने लुक देखील बदलला आहे. चिन्मयने बॉडी कमी केली असून त्याचे केसही वाढलेले दिसत आहेत.  चिन्मय या आधी 'घाडगे अॅड सून' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. योग योगेश्वर जयशंकर मालिकेत चिन्मय साकारत असलेली भूमिका ही फार वेगळी असून चिन्मय एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. तर अभिनेत्री उमा पेंढारकरही मालिकेत पार्वती बाईंची भूमिका साकारताना दिसणार आहे. उमा साकारत असलेली पार्वती म्हणजे नक्की कोण आहेत याची सर्वांना उत्सुकता आहे.   उमा या आधी 'स्वामिनी' या ऐतिहासिक मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर उमा आता योगयोगेश्वर जयशकंर या पौराणिक मालिकेत दिसणार आहे. शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणपर्यंतचा प्रवास मालिकेतून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. त्यामुळे मालिका पाहण्यासाठी सगळेच आतुर असल्याचं दिसत आहे.
    First published:

    Tags: Colors marathi, Marathi entertainment

    पुढील बातम्या