Love Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन

मारिया आणि हुसेन चेकोस्लोवाकियामध्ये भेटत होते. त्यांचं हे सहजीवन 8 वर्ष सुरू होतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 15, 2019 07:46 AM IST

Love Story : माधुरी नाही मारियावर 'फिदा' होते MF हुसेन

मुंबई, 14 फेब्रुवारी : ते होते 90 वर्षांचे आणि आता ती 70 वर्षांची झाली होती. 45 वर्षांपूर्वी ते तिला भेटले तेव्हा ती 23-24 वर्षांची होती. ते स्वत: 40 वर्षांचे होते. आता तिला भेटायला ते आॅस्ट्रेलियाला पोचले. दोघांनी एकमेकांना पाहिलं. मग त्यांनी हसून म्हटलं, अरेच्चा तुझे केसही माझ्यासारखे पांढरे झालेत. पुढचे तीन दिवस दोघांनी एकत्र घालवले.

ही प्रसिद्ध प्रेमकहाणी आहे 2005ची. ते होते प्रसिद्ध चित्रकार. 95वर्षांपर्यंत ते अवलिया मनमौजी जगले. सुंदर स्त्रिया त्यांची वीकपाॅइंट होता. अर्थातच, आम्ही बोलतोय मकबूल फिदा हुसेन यांच्याबद्दल.

मकबूल 50व्या दशकात प्रसिद्ध झाले होते. त्यांचे संघर्षाचे दिवस संपले होते. परदेशात त्यांच्या चित्रांची प्रशंसा व्हायची. 1956मध्ये प्राग इथे त्यांच्या 34 चित्रांचं प्रदर्शन होतं. एक सुंदर तरुणी दालनात चित्र बघत होती. अगदी मंत्रमुग्ध होऊन. हुसेन तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, आवडली का चित्र? तिनं मान हलवली, तशी त्यांनी सगळी चित्रं तिला भेट दिली. ती थक्कच झाली. पुन्हा परत यायचा शब्द देऊन ती निघाली.

आठ वर्ष सुरू होतं नातं

त्यानंतर मारिया आणि हुसेन चेकोस्लोवाकियामध्ये भेटत होते. एम.एफ.हुसेन यांनी भारतात यायचं टाळलं. ते बराच काळ तिथे थांबले. दोघंही प्रागमध्ये हातात हात खालून फिरायचे. त्यांचं हे सहजीवन 8 वर्ष सुरू होतं. 1956पासून 1964पर्यंत. हुसेन यांना मारियाशी लग्न करायचं होतं.

Loading...

हुसेन लेखक विक्रम सिंग यांना म्हणाले, ही आठ वर्ष आठ मिनिटांसारखी गेली.

दोघांनी चर्चमध्ये लग्न करायचा घेतला निर्णय

मारियासोबत हुसेन प्राग इथे चर्चमध्ये लग्न करणार होते. त्यांनी भारतात आपली बायको फाजिलाला फोन केला. सगळं काही सांगितलं. त्यांनी फाजिलाकडे घटस्फोट मागितला. फाजिला बिबीशी त्यांचं 1941मध्ये लग्न झालं होतं. आपल्या अब्बू-अम्मीसाठी त्यांनी हे लग्न केलं होतं. तिच्यापासून तिला 6 मुलं होती. फाजिला  घटस्फोट द्यायला तयार झाली.

हुसेन लंडनला लग्नाचा पोशाख खरेदी करायला गेले आणि...

ते लंडनला गेले. पण ऐन वेळी मारियाचं मन बदललं. तिच्या मते, हे लग्न टिकणार नाही. कारण दोघांच्या संस्कृतीत खूप फरक होता. ती भारतात यायला तयार नव्हती. पण हुसेन यांनी मारियाला सोडलं नाही. तिनं पुढे जाऊन शास्त्रज्ञ जेन डाॅटियरशी लग्न केलं. त्या लग्नाला एम.एफ.हुसेन गेले होते.

त्यानंतर मारिया लग्नानंतर आॅस्ट्रेलियाला चालली होती तेव्हा हुसेन प्रागला गेले. त्यांना मारियाला भेट दिलेली चित्र कस्टममधून क्लियर करायची होती. त्यांच्या आणि मारियाच्या नात्यावर ती चित्र होती.

आपल्या प्रेमकहाणीवर बनवला सिनेमा

हुसेन मारियाला कधी विसरू शकले नाहीत. त्यांनी तब्बूला घेऊन बनवलेला सिनेमा "मीनाक्षीः ए टेल ऑफ थ्री सीटीज" हा मारियावर होता. मारियाला आॅस्ट्रेलियात शोधायचं कठीण काम हुसेन यांनी केलं. मेलबर्नला मारियाच्या मुलीनंच त्यांचं स्वागत केलं.  मारियानं त्यांच्यासाठी जेवण बनवलं. दोघंही जुन्या आठवणीत रममाण झाले.

दोघं 45 वर्षांनी भेटले

हुसेन यांचं प्रेम बरचसं प्लेटोनिक लव्ह होतं. हुसेन यांचं आत्मचरित्र लिहिणाऱ्या लेखकाला त्यांनी सांगितलं, आमचे शारीरिक संबंध होते. मारियाचा निरोप घेऊन परतताना हुसेन यांनी सिनेमाची डीव्हीडी मारियाला दिली.

मारियानं हुसेन यांच्या निधननंतर त्यांची अमानत परत केली

 9 जून 2011मध्ये हुसेन यांचं निधन झालं. त्यानंतर मारिया प्रागला परतली. तिच्याकडे असलेली करोडो-अब्जो रुपयांची हुसेन यांची चित्र तिनं त्यांच्या कुटुंबाकडे परत केली. ती चित्रं भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2019 07:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...