Home /News /lifestyle /

धक्कादायक! Butt lift surgery बेतली जीवावर; शस्त्रक्रियेनंतर मॉडेलचा मृत्यू

धक्कादायक! Butt lift surgery बेतली जीवावर; शस्त्रक्रियेनंतर मॉडेलचा मृत्यू

कोलंबियाला जाऊन मॉडेलनं butt lift surgery केली होती. या शस्त्रक्रियेतून ती बरी झाली नाही.

    वॉशिंग्टन, 22 डिसेंबर : सुंदर दिसण्यासाठी लोक काय काय नाही करत. आता तर फक्त मेकअपनंच सौंदर्य खुलवता येत नाही तर शरीरही जसं आपल्याला हवं तसं मिळवता येतं. म्हणजे भले जन्मापासून आपल्यात एखादी शारीरिक उणीव असेल तरी ती भरून काढता येते आणि याचा मार्ग म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी. (cosmetic surgery) कुणाला आपलं नाक टोकदार हवं आहे, कुणाला आपले ओठ गुलाबाच्या पाकळीसारखे हवे आहेत, कुणाला आपले डोळे मोठे करून हवेत आहेत हे सर्व सर्व काही या कॉस्मेटिक सर्जरीमुळे शक्य झालं आहे. मात्र असं आर्टिफिशिअल सौंदर्य मिळवण्याच्या नादात कित्येक जण आपल्या शरीराची वाट तर लावतातच पण हेच सौंदर्य जीवावरही बेततं. अमेरिकेतील एका मॉडेलचाही अशाच सर्जरीमुळे जीव गेला आहे. अमेरिकेतील मॉडेल आणि फॅशन डिझायनर जोसलीन कॅनोचा  (Joselyn Cano) मृत्यू झाला आहे. तिला मेक्सिनकन किम कर्दाशिया (Mexican Kim Kardashian) म्हणूनही ओळखलं जात होतं. वयाच्या 29 व्या वर्षीच तिनं जगाचा निरोप घेतला आहे.मिळालेल्या माहितीनुसार बट लिफ्ट सर्जरीनंतर (butt lift surgery) जोसलीनचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जोसलीननं नुकतीच बट लिफ्ट सर्जरी केली होती. सर्जरीसाठी ती कोलंबियाला गेली होती. पण काही कारणामुळे ती सर्जरीतून बरी झाली नाही आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - मीनाक्षीच्या 'Sidecar' नावाच्या बारचा जगातील सर्वोत्तम 100 मध्ये समावेश जोसलीनचा जन्म 14 मार्च, 1990 मध्ये झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षापासूनच तिनं मॉडलिंग सुरू केलं होतं. ग्लॅमरस स्टाइल आणि लूकमुळे तिला मेक्सिकोची किम कार्दशियन म्हणून ओळखलं जायचं. जोसलीनच्या मृत्यूवर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही आहे. तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर तिच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला जातो आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Model, Surgery, World news

    पुढील बातम्या