मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Methi-Ajwain Water: मेथी-ओव्याचे पाणी हिवाळ्यात पिण्याचे इतके आहेत फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Methi-Ajwain Water: मेथी-ओव्याचे पाणी हिवाळ्यात पिण्याचे इतके आहेत फायदे; जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत

Methi-Ajwain Water Benefits: मेथी (Methi) आणि ओवा (Ajwain ) दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने आरोग्यासाठी दुप्पट फायदेशीर ठरतात. मेथीचे पाणी आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे आणि ते कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 डिसेंबर:  मेथी फक्त आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे. ओव्याच्या फायद्यांविषयी आपल्याला माहीत असेलच. पण, तुम्ही कधी मेथी आणि ओव्याचे पाणी एकत्र प्यायला आहात का? मेथी आणि ओवा एकत्र करून त्याचे पाणी प्यायल्यास आरोग्यास अनेक प्रकारे फायदा होतो. मेथी-ओव्याच्या पाण्याचे हिवाळ्याच्या दिवसात अधिकच फायदे मिळतात. कारण, या दोन्ही गोष्टींचा (Methi-Ajwain Water) नैसर्गित गुणधर्म गरम (हॉट) आहे.

मेथीमध्ये फॉस्फरस, प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक असतात. दुसरीकडे, ओव्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, थायामिन, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, लोह, नियासिन, प्रथिने, चरबी आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. या दोन्ही गोष्टी एकत्र घेतल्याने आरोग्यासाठी दुप्पट फायदेशीर ठरतात. मेथीचे पाणी आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे (Benefits of Methi-Ajwain Water) आणि ते कसे बनवायचे याबाबत जाणून घेऊया.

सर्दी-खोकला

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याची समस्या खूप कॉमन असते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मेथी-ओव्याचे पाणी वापरू शकता. वास्तविक, मेथी आणि ओवा दोन्हीमध्ये असे अनेक घटक असतात. जे तुम्हाला फक्त सर्दी आणि खोकल्यापासूनच नाही तर व्हायरल फ्लूपासूनही आराम देण्यास मदत करतात.

प्रतिकारशक्ती वाढते

मेथी-ओव्याचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात देखील फायदेशीर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास हंगामी आजारांचा धोकाही कमी होतो. वास्तविक, मेथी-ओव्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे गुणधर्म असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात.

हे वाचा - Winter skin care: थंडीमध्ये त्वचेसाठी जबरदस्त आहे हे होममेड सीरम; अनेक महागडी प्रॉडक्ट पडतील फेल

वजन कमी करण्यासाठी प्रभावी

आरोग्यासोबतच मेथी-ओव्याचे पाणी वजन कमी करण्यासाठीही गुणकारी आहे. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथी-ओव्याचे पाणी सेवन केल्यास चरबी लवकर जळते.

पचन सुधारते

मेथी-ओव्याचे पाणी पचन सुधारण्यास खूप मदत करते. रोज हे प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. यासोबतच पोटदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळण्यास मदत होते.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

मेथी-ओव्याचे पाणी कसे बनवायचे

मेथी-ओव्याचे पाणी बनवण्यासाठी मेथी आणि ओवा समान प्रमाणात भिजवून रात्रभर ठेवा. हे पाणी सकाळी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा. तुम्ही त्यात मध आणि लिंबू देखील मिक्स करू शकता.

(सूचना : या लेखात दिलेली सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. )

First published:

Tags: Health, Health Tips