रक्ताच्या फक्त एका थेंबातून समजणार Cancer, शास्त्रज्ञांनी विकसित केलं नॅनोसेन्सर

रक्ताच्या फक्त एका थेंबातून समजणार Cancer, शास्त्रज्ञांनी विकसित केलं नॅनोसेन्सर

मेटास्टेटिक कॅन्सरचं (Metastatic cancer) निदान करण्यासाठी रक्तातील कॅन्सर बायोमार्कर (Biomarker) शोधण्यासाठी हा एक उत्तम असा मार्ग आहे.

  • Share this:

अॅमस्टरडॅम, 24 फेब्रुवारी : मेटास्टेटिक कॅन्सर (Metastatic cancer) म्हणजे शरीराच्या एका भागात झालेला कॅन्सर इतर भागांमध्ये पसरणे आणि हा कॅन्सर आता फक्त एका रक्ताच्या थेंबातून समजणार आहे. नेदरलँडच्या (Netherland) संशोधकांनी असं उपकरण तयार केलं आहे, ज्यामुळे हे शक्य होणार आहे.

नेदरलँडच्यायुनिव्हर्सिटी ऑफ ट्वेंटे (University of twente) आणि वॅगनिंगेन युनिव्हर्सिटीच्या (Wageningen university)  संशोधकांनी एक असं नॅनोसेन्सर (Nanosensor) विकसित केलं आहे, जे रक्ताच्या (blood) एका थेंबातून कॅन्सरचं (cancer) निदान करू शकेल. हा सेन्सर 10 कण प्रति मायक्रोलीटर ते 10 लाख कण प्रति मायक्रोलीटरच्या बायोमार्करमधून कॅन्सरचं निदान करू शकतो. ज्यामुळे या उपकरणाच्या मदतीने रक्ताच्या एका थेंबातून मेटास्टेटिक कॅन्सरचं निदान होऊ शकतं.

हेदेखील वाचा - पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ कॅन्सरचा सर्वाधिक धोका, लक्षणांबाबत माहिती असू द्या

हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या 'नॅनो लेटर्स' (Nano Letters) या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मेटास्टेटिक कॅन्सर किंवा मेटास्टेटिक ट्युमर म्हणजे शरीराच्या एका भागात झालेला कॅन्सर विविध भागात पसरणे.  मेटास्टेसिस कॅन्सर पेशींमध्ये लसिका प्रमाणाली किंवा रक्तप्रवाहातून शरीराच्या इतर भागात पसरतो. कॅन्सरच्या ट्युमरपासून निर्मित झालेल्या पेशीय पुटीका (Cellular vesicle) कॅन्सर बायोमार्करमध्ये रुपांतरित होता.  इतर कॅन्सर बायोमार्करच्या तुलनेत सेल्युलर वेसिकल्स रक्तात जास्त प्रमाणात असतात. तर इतर रक्तघटकांच्या तुलनेत त्यांची घनता खूपच कमी असते. त्यामुळे या कॅन्सरचं लवकर निदान होत नाही. मात्र आता संशोधकांनी विकसित केलेल्या या नॅनोसेन्सरमुळे ते शक्य होणार आहे.

कसं बनवलं नॅनोसेन्सर?

नॅनोस्केलवर सेन्सर 2 कंगव्याप्रमाणे एकमेकांमध्ये अडकल्यासारखे दिसतात, जे 2 कंगव्यांच्या दातांमध्ये जागा सोडतं. यामध्ये 120 नॅनोमीटरच्या आकाराचे इलेक्ट्रोड असतात. छोट्या आकाराची जागा संकेत देतं. हे सेन्सर कॅन्सरच्या कणांची माहिती सहजसोप्यारित्या मिळू शकते.

हेदेखील वाचा - ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन-पेनची नाही गरज; Diabetes साठी स्मार्ट पॅच पुरेसंं

First published: February 24, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading