Home /News /lifestyle /

Mental Stress Benefits : तुम्हाला माहितीये? मेंटल स्ट्रेसने केवळ नुकसानच नाही तर हे फायदेही होतात

Mental Stress Benefits : तुम्हाला माहितीये? मेंटल स्ट्रेसने केवळ नुकसानच नाही तर हे फायदेही होतात

एका संशोधनातून असे समोर आले आहे की जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता जेथे तुम्हाला दररोज काही प्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो. तेव्हा हा तणाव खरे तर तुमचा मेंदू विकसित करण्यास मदत करत असतो.

  मुंबई, 06 ऑगस्ट : तणाव आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगला नसतो हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. इतकंच नाही तर ताणतणावामुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचते. पण एका नव्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, मेंदूची काम करण्याची क्षमता सुधारण्यासाठी तणावाचा महत्त्वाचा वाटा असतो. न्यूरो सायन्सन्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, संशोधक जॉर्जिया युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट फॉर युथ डेव्हलपमेंटच्या संशोधनात असे आढळून आले की, कमी ते मध्यम पातळीचा ताण, मानसिक आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतो. संशोधनानुसार, जरी तुमचे डोके जड वाटत असेल किंवा तणावामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल, परंतु थोड्या काळासाठी येणार ताण तुमच्या मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतो. मात्र जास्त प्रमाणातील तणाव मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. असेही या संशोधनात आढळून आले आहे. संशोधकांना काय आढळले नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की कमी किंवा किंचित जास्त तणावामुळे मानसिक लवचिकता वाढते आणि मानसिक विकार होण्याची शक्यता कमी होते. उदासीनता आणि समाजविरोधी वर्तन यांसारख्या समस्या कमी करण्यातही हे मदत करू शकते. हे कौशल्य विकास आणि वैयक्तिक विकासामध्ये प्रभावी सुधारणा आणते. संशोधक काय म्हणतात या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि कॉलेज ऑफ फॅमिली अँड कन्झ्युमर सायन्सेसमधील सहयोगी प्राध्यापक असफ ओश्री म्हणतात की, जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता जिथे तुम्हाला दररोज काही प्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो. तेव्हा हा ताण तुमच्या मनाचा विकास करण्यास मदत करतो आणि तुम्हाला एक कार्यक्षम आणि प्रभावी कर्मचारी बनण्यास मदत करतो. इतकंच नाही तर तुमची कामगिरी सुधारण्यातही खूप मदत होते.

  Health Tips: डिप्रेशन दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका

  उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करता तेव्हा हलका तणाव तुमच्यासाठी फायदेशीर असतो. हा ताण तुमची कार्यक्षमता वाढवण्यास खूप मदत करतो. त्याचप्रमाणे ऑफिसमधील दीर्घ आणि महत्त्वाच्या बैठकीच्या तयारीवर ताण देणे आणि पूर्व तयारी यामुळे तुमची वैयक्तिक वाढ पूर्वीपेक्षा अधिक होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय जेव्हा एखाद्या लेखकाचे लेखन प्रकाशकाकडून नाकारले जाते तेव्हा लेखकाला नक्कीच तणावाचा सामना करावा लागतो, परंतु हा ताण त्याला अधिक मेहनत करण्यास मदत करतो आणि त्याचा परिणाम त्याच्या पुढील लिखाणात दिसून येतो.

  Types of Heart disease : तुम्ही फक्त हार्ट अटॅकचंच टेन्शन घेताय; तुम्हाला माहिती नसतील असे हृदयाचे आजार

  अत्याधिक ताण धोकादायक प्रोफेसर असफ ओश्री सांगतात, अशा तणावामुळे आपल्याला मजबूत होण्यास मदत होते, परंतु तणाव सहन करण्याची क्षमतादेखील लोकांचे वय, परिस्थिती, वातावरण, जनुकीय पातळी इत्यादींवर अवलंबून असते. प्रोफेसर ओश्री यांच्या म्हणण्यानुसार, अधिक दिवस ताणतणाव वाढत राहिल्यास त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होऊ शकते. उदाहरणार्थ - गरिबी, मानसिक शोषण यासारख्या दीर्घकालीन तणावामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्ती, भावनांचे नियमन आणि मेंदूच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Mental health, Stress

  पुढील बातम्या