Home /News /lifestyle /

आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ही समस्या, कोरोना काळात संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

आरोग्य कर्मचाऱ्यांनाही ही समस्या, कोरोना काळात संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारी आणि डॉक्टर सतत त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची देखील चिंता असते.

  नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : जगामध्ये या आधी आलेल्या महामारीनंतर pandemics 23.4 टक्के आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात तणावाखाली असल्याचं दिसून आलं आहे. या तणावाला post-traumatic stress disorder (PTSD) असं म्हटलं जातं. यापैकी 11.9 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ही समस्या वर्षभर राहत असल्याचं देखील संशोधनात समोर आलं आहे. ब्रिटनमधील ईस्ट अँजेलिया विद्यापीठातील संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलं आहे. यामध्ये तणाव आणि चिंता ही या कालखंडातील सामान्य लक्षणं असल्याचंदेखील या संशोधनात समोर आले आहे. या संशोधनात संशोधकर्त्यांनी मागील कालखंडातील SARS आणि MERS या आजारावेळी या कर्मचाऱ्यांची स्थिती काय होती याचा देखील अभ्यास केला आहे. कोरोनाच्या (Covid-19) या काळामध्ये रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी सतत रुग्णांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीचा ताण आल्याचे ब्रिटनमधील नॉर्विच मेडिकल स्कूलमधील (UEA's Norwich Medical School) प्राध्यापक रिचर्ड मेजर-स्टीडमॅन (Richard Meiser-Stedman) यांनी म्हटलं आहे. या संशोधनात ताणतणावाच्या डेटाचा अभ्यास केला असून यामध्ये 34.1 टक्के कर्मचाऱ्यांमध्ये तणाव आणि चिंता आढळून आली आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे मागील सहा महिन्यांमध्ये यामध्ये घट झाली असून हे प्रमाण 17.9 टक्क्यांवर आलं आहे. हे वाचा - कोरोना काळात GYM मध्ये जाण्याची भीती; घरच्या घरीच 5 App तुम्हाला ठेवतील FIT हे संशोधन कोरोना काळातील आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांच्या चिंतेवर आणि तणावावर नजर टाकण्यास महत्त्वाचं ठरणारं असल्याची आशा या संशोधकांच्या टीमने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आणि चिंता असल्याचं माध्यमांद्वारे संगितलं जात होतं. त्यामुळे याविषयी संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये मागील आजारांवेळी असणारी कर्मचाऱ्यांची स्थिती आणि सध्या कोरोनाकाळात असणारी स्थिती यांचा अभ्यास केल्याचं संशोधनकर्त्यांनी सांगितलं. वाचा - आता कॅन्सरचा धोका टाळता येणार; शास्त्रज्ञांनी शोधून काढला उपाय त्याचबरोबर कोरोना रुग्णांवर उपचार करणारे कर्मचारी आणि डॉक्टर सतत त्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याची देखील चिंता असते. याच बरोबरीने त्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा साधनांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये तणाव आणि चिंता वाढल्याचं देखील मेझर-स्टेडमॅन यांनी म्हटलं.

  वाचा - आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी

  या संशोधनात त्यांनी आशिया आणि कॅनडामध्ये आलेल्या SARS च्या साथी दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती आणि त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची स्थिती यासंबंधी 19 विषयांचा अभ्यास केला. त्याच पद्धतीने कोरोना कालखंडात (coronavirus) देखील आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती आणि त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांची स्थिती याचा अभ्यास करण्यात आला. या संशोधनात कोरोना कालखंडातील स्थिती आणि त्याआधी 12 महिन्यांनी असणाऱ्या स्थितीमध्ये फरक नसल्याचं सायकॉलॉजिस्ट सोफी अॅलन यांनी म्हटलं आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या