मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लठ्ठपणा टाळण्यासाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही राखा

लठ्ठपणा टाळण्यासाठी फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही राखा

लठ्ठपणा (obesity) आणि मानसिक आरोग्य (mental health) यांचा एकमेकांशी संबंध आहे.

लठ्ठपणा (obesity) आणि मानसिक आरोग्य (mental health) यांचा एकमेकांशी संबंध आहे.

लठ्ठपणा (obesity) आणि मानसिक आरोग्य (mental health) यांचा एकमेकांशी संबंध आहे.

    मुंबई, 27 ऑक्टोबर : लठ्ठपणाचा फक्त शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे लठ्ठपणा येऊ शकतो आणि कधी कधी लठ्ठपणामुळे अकारण चिंता तसंच भावनिक असंतुलन यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवू शकतात. कोरोना लॉकडाऊनमध्ये तर ही समस्या अधिकच दिसून येते आहे. धकाधकीची जीवनशैली, आहारची अनिश्चित वेळा आणि शारीरिक श्रम कमी हे वजन वाढीला कारणीभूत ठरतंय.  या लठ्ठपणामुळे त्रस्त व्यक्तींच्या जीवनात प्रचंड तणाव आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे, असं मुंबईतील ग्लोबल आणि अपोलो रुग्णालयातील बेरिअॅट्रिक अँड लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितलं. सध्या सोशल मीडियावर लठ्ठपणाबाबत अनेक विनोद केले जात आहेत. यामुळे लठ्ठ व्यक्तीमधील आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती कमी होत असून अनेक लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. ज्यामुळे नैराश्य, चिंता, एकांतात राहणं, कमी बोलणं आणि चिडचिड करणं अशी लक्षणं व्यक्तीमध्ये दिसत आहेत. लठ्ठ पुरूषांच्या तुलनेत लठ्ठ महिलांमध्ये नैऱाश्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. हे वाचा - केस गळणं हे Coronavirus चं नवं लक्षण? अभ्यासातून नवी माहिती आली समोर मानसिक समस्या असणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मेटाबॉलिज्म सिंड्रोम हे स्क्रिझोफ्रेनिया या मानसिक आजाराशी संबंधित आहे. अँन्टीसायकोटिक ही औषध वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात आणि इन्सुलिन रेझिस्टन्सवर परिणाम करतात. बऱ्याचदा मानसिक आजारांमध्ये अतिरिक्त खाण्याची सवय, कुठल्याही गोष्टीत रस नसणं, घाईघाईत खाणं अशा विचित्र सवय दिसून येतात. हे वाचा - मासिक पाळीत Swimming करताना चिंता सोडा; फक्त छोटीशी काळजी घेऊन बिनधास्त पोहा लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य अशा दुहेरी समस्येचा सामना करणाऱ्यांना आता आधार देण्याची गरज आहे. त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. तसेच लठ्ठपणाबद्दल सोशल मिडियावर सुरू असलेल्या विचित्र संदेशाचा स्वर आपल्याला बदलावा लागेल. लठ्ठपणाच्या समस्येबाबत प्रत्येकाने संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे. कारण, लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य हे परस्परांशी संबंधित आहे. त्यामुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहणं गरजेचं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle, Weight loss

    पुढील बातम्या