मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जाऊ द्या..! माफ केल्यानं तुमच्या मनाला मिळेल अधिक आराम; Forgiveness च्या या आहेत सोप्या पद्धती

जाऊ द्या..! माफ केल्यानं तुमच्या मनाला मिळेल अधिक आराम; Forgiveness च्या या आहेत सोप्या पद्धती

Forgiveness Is Miracle : त्या घटनांना विसरून संबंधित लोकांना माफ केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि तुम्हाला अधिक हलकं-फुलकं वाटतं. मात्र, व्यवहारात स्वतःशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना माफ करणं इतकं सोपं नसतं. मात्र,..

Forgiveness Is Miracle : त्या घटनांना विसरून संबंधित लोकांना माफ केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि तुम्हाला अधिक हलकं-फुलकं वाटतं. मात्र, व्यवहारात स्वतःशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना माफ करणं इतकं सोपं नसतं. मात्र,..

Forgiveness Is Miracle : त्या घटनांना विसरून संबंधित लोकांना माफ केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि तुम्हाला अधिक हलकं-फुलकं वाटतं. मात्र, व्यवहारात स्वतःशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना माफ करणं इतकं सोपं नसतं. मात्र,..

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : आपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्यामुळे आपण आतून खूप नाराज किंवा दुखी राहतो. आपल्याशी एखादी व्यक्ती वाईट वागली असेल किंवा एखाद्याशी तुमचं मोठं भांडण झालं असेल तर त्यामुळं आपलं मन दुखावतं. आपण त्या व्यक्तीशी बोलणं टाळतो. मात्र, यावर मानसिक आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, तुम्ही तुम्हाला दुखावलेल्या लोकांना माफ केलं (forgiveness) तर तुमचं स्वतःचं जीवन चमत्कारिकरित्या चांगलं होईल. त्या घटनांना विसरून संबंधित लोकांना माफ केल्यानं तुमच्या जीवनात सकारात्मकता येते आणि तुम्हाला अधिक हलकं-फुलकं वाटतं. मात्र, व्यवहारात स्वतःशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांना माफ करणं इतकं सोपं नसतं. काही लोकांनामुळे आयुष्यात इतका राग, पश्चात्ताप इत्यादी येतो की, ही कटुता सहज दूर करणं कठीण निर्णय आहे. पण, हे देखील खरं आहे की जर तुम्ही तुमच्या आयुष्यात खरोखरच पुढे जाण्याचा विचार करत असाल तर ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्यांना माफ करणंच फायद्याचं आहे. या लेखात आम्ही तुम्हाला असे 4 उपाय सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला एखाद्याला माफ करणं सोपं होऊ शकतं, जेणेकरून तुमची मानसिकता अधिक (forgiveness benefits on mental health) चांगली होईल.

एखाद्याला माफ करण्यापूर्वी स्वतःची अशी मानसिक तयारी करा

1. माफ करणं तुम्हाला श्रेष्ठ बनवतं

नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की, एखाद्याला क्षमा केल्याने तुम्ही मोठे होता. असे केल्याने ना कोणाचे नुकसान होते ना कोणाचा फायदा. याचा सर्वाधिक फायदा कोणाला होत असेल तर तो तुम्हाला होईल. असे केल्याने तुमच्या डोक्यावरील मानसिक ओझं कमी होईल आणि तुम्ही अधिक कार्यक्षमपणे काम करू लागाल. थेट सांगण्याची वेळ आल्यास त्याला किंवा तिला मी तुला माफ केलं, असं सांगून दुसऱ्याशी असं वागू नका म्हणून सांगू शकता.

2. सकारात्मक शोधा

जर तुम्ही संबंधिताला माफ करण्याचे ठरवले तर त्याच क्षणापासून तुम्हाला हलकं वाटू लागतं. हे काम सोपं नसलं तरी मानसिकदृष्ट्या अशा परिस्थितीचा सामना करून रात्रीची झोप गमावलेली व्यक्ती याचं महत्त्व समजू शकते. परंतु, काहीही झालं तरी सकारात्मक दृष्टिकोन शोधण्यासाठी स्वत:ला तयार करा. त्यासाठी मनाची तयारी करायला वेळ लागला तरी हरकत नाही.

हे वाचा - PHOTOS: भारतातील ती ठिकाणं जिथे साजरी होत नाही दिवाळी; ना दिवे लावले जातात ना लक्ष्मीपूजन होतं, वाचा कारण

3. स्वतःची काळजी घ्या

कठीण काळात स्वत:ची काळजी घ्या, स्वत:वर प्रेम करा. तुम्हाला आनंद देणार्‍या काही गोष्टी करा. स्व-प्रेम सरावाच्या मदतीने तुम्ही इतरांना क्षमा करण्याचे धैर्य वाढवू शकाल. अशा परिस्थितीत, काही चांगल्या उपक्रमांमध्ये व्यग्र रहा आणि एक चांगली निरोगी दिनचर्या पाळा. असे केल्यानं तुम्ही स्वतःला चांगले ठेवू शकाल आणि तुम्हाला अधिक बरं वाटू शकेल.

हे वाचा - घटस्फोटानंतर महिनाभरातच समंथाने दिली Good News! नागार्जुन परिवार सोडल्यानंतर काय करतेय अभिनेत्री?

4. प्रथम स्वतःला माफ करा

इतरांना माफ करण्याची सुरुवात स्वतःला माफ करण्यापासून सुरू होते. अशाप्रकारे आधी स्वतःला माफ करा आणि समजावून सांगा की, असे कोणाशीही घडू शकते आणि त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही. तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्हाला पूर्वीपेक्षा खूप हलकं आणि मानसिक आराम मिळेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health, Mental health