मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता रडून वजन कमी करा, संशोधनातूनच सिद्ध झाले रडण्याचे फायदे

आता रडून वजन कमी करा, संशोधनातूनच सिद्ध झाले रडण्याचे फायदे

सतत रडल्याने वजन कमी होण्याची शक्यता अधिक आहे. चक्क रडण्याचे फायदे एका संशोधनातून समोर आले आहेत.

सतत रडल्याने वजन कमी होण्याची शक्यता अधिक आहे. चक्क रडण्याचे फायदे एका संशोधनातून समोर आले आहेत.

सतत रडल्याने वजन कमी होण्याची शक्यता अधिक आहे. चक्क रडण्याचे फायदे एका संशोधनातून समोर आले आहेत.

  मुंबई, 28 सप्टेंबर : काहींना सवय असते, सतत छोट्या- छोट्या गोष्टींवरून रडत राहणे. आपल्याला आपण रडतो (Effects of crying on your health) याचा आपल्या शरीरावर काहीच परिणाम होणार नाही असे वाटते. पण असे अजिबात नाही आहे. जर वारंवार छोटया छोटया गोष्टींवरून तुम्हाला रडायला (Impact of crying on body) येत असेल, तर यावर आजच ताबा आणा. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, सततच्या रडण्याने ( Weight Loss ) वजन कमी होण्याची शक्यता अधिक निर्माण होऊ शकते.

  सततच्या रडण्याने थकवा होतो दूर...

  एका संशोधकातून असे सिद्ध झाले आहे की, रडल्याने लठ्ठपणा दूर होण्याची शक्यता आहे. शिवाय रडल्याने सुस्ती येणे आणि नैराश्य दूर होते. एका संशोधनातून असे समोर आले आहे, जे लोकं इमोशनल असतात, त्यांच्या शरीरातील कोर्टिसोल या हार्मोन ची पातळी वाढते. ज्यामुळे इमोशनल लोकांना पटकन रडू येते. आणि आपले वजन कमी करण्यास मदत होते.

  शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात...

  'एशियावन'मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, रडल्याने तुमच्या शरीरात असलेले विषारी पदार्थ बाहेर पडतात. यासोबतच बायोकेमिस्ट विल्यम फ्राय यांनी देखील या संशोधनाला समर्थन केले आहे.

  या संशोधनात असेही म्हंटले गेले आहे की, संध्याकाळी 7 ते रात्री 10 दरम्यान रडल्यास वजन घटण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय ही रडण्याची ही सर्वोत्तम वेळ असून, यामध्ये  (Cry And Weight Loss) वजन कमी होते.

  भावनिक अश्रू महत्त्वाचे...

  संशोधनात असेही म्हटले गेले आहे, की यासाठी कधीही, शुल्लक गोष्टीनंवरून किंवा विनाकारण रडल्यास आपले वजन कमी होणार नाही. याजागी आपण ज्यावेळेस भावनिक असू त्यावेळेस रडले असता वजन कमी होण्याची शक्यता असते. आपण ज्या वेळेस मनापासून आणि भावनिक होऊन रडतो त्यावेळेस आपल्या शरीरातील नको असलेले हार्मोन देखील अश्रूंमधून निघून जातात.

  First published:
  top videos

   Tags: Health Tips, Mental health, Weight loss tips