पीरियड्समध्ये तुमच्या या सवयी पडतील महागात, काही दिवसांसाठी जीवनशैली बदला

मासिक पाळीत (Menstrual period) महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं, ज्याचा त्यांच्या जीवनशैलीवरही (lifestyle) परिणाम होतो.

  • Share this:

कठीण व्यायाम - मासिक पाळीत पोटात, पाठीत दुखत असेल, तर जास्त शारीरिक श्रम किंवा कठीण व्यायाम करू नये. यामुळे तुमच्या शारीरिक वेदना तीव्र होऊ शकतात, शिवाय अशक्तपणाही वाटू शकतो. थकव्यामुळे भूक लागणं, उलटी होणं अशा समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे हलका व्यायाम करा.

सॅनिटरी नॅपकीन न बदलणं - मासिक पाळीत स्वच्छता खूप गरजेची आहे. त्यामुळे पीरियड्समध्ये वेळोवेळी आपलं सॅनिटरी नॅपकीन बदलत राहा. 4 ते 5 तासांत सॅनिटरी नॅपकीन बदलणं गरजेचं असतं, यामुळे दुर्गंधीही येणार नाही. मात्र सॅनिटरी नॅपकीन जर बदललं नाही तर गंभीर असं इन्फेक्शन होईल.

घट्ट कपडे घालणं - मासिक पाळी आल्यास घट्ट कपडे घालणे योग्य नाही. यामुळे कम्फर्टेबल वाटत नाही, पूर्ण दिवस तुमची चिडचिड होते. विशेषतः जर तुम्ही घराबाहेर जाऊन काम करत असाल तर घट्ट कपड्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरामदायी असे कपडे घाला.

कमी झोपणं - पीरियड्सच्या दिवसात तरी किमान 8 तासांची झोप घेणं जरूरी आहे. झोप अपूर्ण असल्यास शरीरात वेदना होतात, शिवाय डोकेदुखीचा त्रासही होतो. या दिवसांमध्यो काही महिलांना पोटदुखीचाही त्रास असतो. पोटदुखी आणि डोकेदुखीमुळे तुम्ही हैराण होता. मात्र तुम्ही जर पुरेशी झोप घेतली तर तुमचा शारीरिक आणि मानसिक ताणही दूर होतो.

अल्कोहोलचं सेवन - मासिक पाळीत अल्कोहोलचं सेवन बिलकुल करू नये. या काळात महिलांच्या पोटात वेदना आणि मूडमध्ये बदल होत असतात. अशात जर तुम्ही अल्कोहोल प्यायल्यात तर या समस्या अधिकच वाढू शकतात. त्यामुळे गरम पाणी किंवा हर्बल चहा प्या.

शारीरिक संबंध - मासिक पाळीत एक लक्षात ठेवा की, शारीरिक संबंध ठेवू नका. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो, शिवाय वेदनाही तीव्र होऊ शकतात.

सूचना – या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

सूचना – या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.Ha

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 01:12 PM IST

ताज्या बातम्या