लग्नाआधी मुलांनी 'या' गोष्टी शिकाव्यात, नंतरच डोक्याला मुंडावळ्या बांधाव्यात

लग्न (Marriage) म्हटलं की मुली अनेक गोष्टी शिकून घेतात मात्र फक्त मुलीच नव्हे तर मुलांनीही काही गोष्टी शिकणं आवश्यक आहे, ज्यामुळे संसार सुखाचा होईल.

  • Share this:

छोट्या छोट्या कारणांसाठी तुम्ही शपथ घेत असाल, तर ही सवय बदला. यामुळे तुमच्या वैवाहिक अनेक अडचणी येतील.

तुम्ही जर जेवण बनवायला शिकलात तर तुमची होणारी पत्नी खूप खूश होईल. शिवाय पत्नी घरी नसेल, तेव्हा तुम्हाला जेवणाची काळजी करण्याची गरज नाही. गरज पडेल तेव्हा तुम्ही जेवण बनवून पत्नीला खूश करू शकता. सुखी संसाराचा एक चांगला मंत्र आहे.

लग्नानंतर तुम्ही एकाचे दोन होता त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारा. पैशांशी संबंधित बॅकअप प्लॅनही हवा. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तुमच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येतील.

आर्थिक व्यवहार शिकून घ्या. लग्नाआधी तुम्ही पैसा खर्च करताना विचार करत नाही, मात्र लग्नानंतर विचार करून पैसे खर्च करावे लागतात कारण जबाबदाऱ्या वाढतात. पैसे वाचवणं ही एक कला आहे, ज्यामुळे भविष्य सुरक्षित होतं.

तुम्ही अबोल असाल तर तुमचं बोलणं वाढवा, जेणेकरून तुमचा जोडीदार तुमच्याशी मोकळेपणाने संवाद साधेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 07:54 PM IST

ताज्या बातम्या