मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Men Skin Care : पुरुषांनी हे स्किन केअर प्रोडक्ट नक्की जवळ ठेवावे, त्वचा आणि केसही राहतील उत्तम

Men Skin Care : पुरुषांनी हे स्किन केअर प्रोडक्ट नक्की जवळ ठेवावे, त्वचा आणि केसही राहतील उत्तम

बहुतेक पुरुषांना मूलभूत स्किन केअर उत्पादनांची कल्पना नसते. त्यामुळे पुरुषांना उत्तम लूक कॅरी करणे कठीण होऊन बसते. परंतु पुरुष स्किन केअर रुटीनमध्ये विशिष्ट प्रकारच्या उत्पादनांचा समावेश करून त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेऊ शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 14 ऑगस्ट : सामान्यत: स्त्रिया आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी काही सौंदर्य उत्पादने नेहमी सोबत ठेवतात. पण बिझी शेड्युलमुळे जिथे पुरुषांना स्किन केअरसाठी जास्त वेळ मिळत नाही. त्याच वेळी कमी वेळेत त्वचेची काळजी घेणे देखील पुरुषांसाठी खूप कठीण काम बनते. मात्र पुरुषदेखील काही महत्त्वाच्या गोष्टी जवळ ठेवून आपल्या त्वचेची विशेष काळजी घेऊ शकतात. वास्तविक काही पुरुष सौंदर्यप्रसाधने निवडण्यात कुशल असतात आणि स्वतःसाठी बाजारातून फक्त सर्वोत्तम स्किन केअर उत्पादने आणतात. मात्र बहुतेक पुरुषांना स्किन केअर उत्पादनांबद्दल फारशी माहिती नसते. म्हणूनच आम्ही तुम्हाला पुरुषांसाठी आवश्यक असणाऱ्या काही उत्पादनांबद्दल सांगणार आहोत मॉइश्चरायझर आणि स्क्रब परिपूर्ण त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार मॉइश्चरायझर आणि स्क्रब निवडू शकता. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पाणी किंवा जेल तुमच्यासाठी सर्वोत्तम मॉइश्चरायझर असू शकते. तर कोरड्या त्वचेसाठी तेल सर्वोत्तम मॉइश्चरायझर असते. याशिवाय स्क्रबचा वापर त्वचेतील मृत पेशी आणि घाण कण काढून त्वचेवर चमक आणण्यास मदत करतो.

Weak Grip Of Hands : तुमच्या हाताची पकड कमकुवत होतेय का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

लोशन आणि लिप बाम इरिटेशन, फुगणे आणि लालसरपणा टाळण्यासाठी पुरुषांनी विशेषतः शेव्हिंगनंतर लोशन वापरावे. यासाठी तुम्ही अल्कोहोल फ्री आफ्टरशेव्ह लोशन वापरून पाहू शकता. तर ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि ओठ मऊ ठेवण्यासाठी लिप बाम किंवा व्हॅसलीनचा वापर करणे चांगले. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पुरुषांच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन किंवा लोशन लावायला विसरू नका. त्याच वेळी सनस्क्रीन निवडताना किमान 20 एसपीएफ असलेले सनस्क्रीन खरेदी करा. चांगल्या संरक्षणासाठी तुम्ही SPF 50 सह सनस्क्रीनदेखील वापरून पाहू शकता. हेअर केअर टिप्स केसांची विशेष काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा हर्बल शॅम्पूने केस धुवा. यामुळे तुमच्या टाळूमध्ये घाण जमा होणार नाही. त्याचबरोबर केसांना सुंदर, मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी शॅम्पूनंतर कंडिशनर लावायला विसरू नका. याशिवाय केस मुळापासून मजबूत आणि निरोगी होण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा एरंडेल तेलाने केसांना मसाज करा.

Diet Tips: पिझ्झासह 'हे' पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य होतं इतक्या मिनिटांनी कमी; संशोधन अहवालात मोठा खुलासा

कन्सीलर आणि हायलायटर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रसंगी कन्सीलर आणि हायलाइटरदेखील वापरू शकता. त्वचेच्या टोननुसार कन्सीलरचा वापर त्वचेवरील डाग लपवण्याचे काम करतो. त्याचबरोबर गाल, भुवया, नाक आणि ओठांच्या आसपास हायलायटर वापरून तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आकर्षक लुक देऊ शकता.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Skin care

पुढील बातम्या