नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : मधुमेहामुळं (Diabetes) व्यक्तीच्या हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी आणि मज्जासंस्थेचं सर्वाधिक नुकसान होतं. याचा सर्वाधिक फटका पुरुष वर्गाला बसतो. रक्तातील साखरेचं प्रमाण वेळीच नियंत्रणात आणलं नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण (Diabetes Awareness) व्हावी, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिना 'मधुमेह जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो.
'आज तक'ने दिलेल्या बातमीनुसार मधुमेह हा इतका भयंकर आजार आहे की, तो अनियंत्रित झाला तर तो माणसाचं संपूर्ण शरीर पोखरू शकतो. या आजाराचा सर्वाधिक परिणाम हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी आणि मज्जासंस्थेवर होतो. रक्तातील साखरेचं प्रमाण वेळीच नियंत्रणात आणलं नाही तर हा आजार माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जाऊ शकतो. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिना 'मधुमेह जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त आम्ही मधुमेहाच्या लक्षणांबद्दल (diabetic symptoms) सांगत आहोत. याकडे पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये.
इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा प्रीमेच्योर इजेकुलेशन (शीघ्रपतन किंवा कामपूर्ती करण्यात असमर्थता) - रक्तातील साखर वाढल्यामुळं नसा आणि धमन्या खराब होतात. त्यामुळं पुरुषांमध्ये शीघ्रपतन होण्यास सुरुवात होते. जर्नल ऑफ इंटरनॅशनल मेडिकल रिसर्चमधील एका अभ्यासात असं दिसून आलंय की 89 टक्के पुरुषांना मेटाबॉलिक सिंड्रोममुळे ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. यामुळं शीघ्रपतनाचा अनुभव येतो. हे मधुमेहाचे सर्वात पहिले लक्षण असू शकते. युरोपियन युरोलॉजी संशोधनानुसार, मधुमेह असलेल्या 23 टक्के पुरुषांना शीघ्रपतनाचा अनुभव आला तर 5 टक्के पुरुषांना विलंबाने स्खलन झालं. तुम्हाला अशी कोणतीही समस्या असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
वारंवार लघवी होणे - वारंवार लघवी होणं हेदेखील मधुमेहाचं लक्षण आहे. किमान 9 प्रकारच्या वैद्यकीय परिस्थितीमुळं लोकांना दिवसभरात वारंवार लघवीला जावं लागतं. सहसा लोक याकडे लक्ष देत नाहीत. परंतु, जर तुम्हाला रात्री दर 2 तासांनी लघवीला जावं लागत असेल तर, तुम्ही याकडं गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेट वाढल्यामुळं ही समस्या उद्भवते, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
यीस्ट इन्फेक्शन - यीस्ट इन्फेक्शन होत असल्यासही पुरुषांमध्ये मधुमेह होऊ शकतो. रक्तातील साखर वाढल्यामुळं यीस्टचा संसर्ग होतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पुरुषांमध्ये यीस्टचा संसर्ग त्यांच्या लिंगावर परिणाम करतो. मात्र, त्यावर सहजतेनं उपचार करता येतात.
थकवा - रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला गेल्यानं झोप नीट पूर्ण होत नाही आणि त्यामुळं थकवा येतो. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानंही शरीरात खूप थकवा येतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेक रुग्णांमध्ये मधुमेहाचं निदान होण्याच्या अनेक दिवस आधीच थकव्याची लक्षणं दिसू लागतात. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर, तुमच्या रक्तातील साखरेची चाचणी करून घ्या.
हे वाचा -
राहुल द्रविडच्या सहकाऱ्यांची लवकरच घोषणा, भारतीय क्रिकेटमधील दिग्गजांची होणार एन्ट्री
वजन वाढणे - वयानुसार वजन वाढणं ही सामान्य बाब आहे. पण नंतर त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 2016 मध्ये झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं होतं की, मधुमेहामुळं पुरुषांचं वजन महिलांच्या तुलनेत कमी होतं. त्यामुळं तुमचे वजन वाढू लागले आहे असे तुम्हाला वाटत असेल तर, हेदेखील मधुमेहाचं लक्षण असू शकतं. याशिवाय, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळंही वजन वाढतं, ज्यामुळं मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
व्यायामादरम्यान छातीत दुखणं- प्री-डायबिटीजमध्ये अनेक चयापचयासंबंधी समस्या असतात. त्यापैकी एक आहे उच्च रक्तदाब. यामुळं, छातीत दुखणे आणि इस्केमियाचा (ठराविक अवयवापर्यंत योग्य प्रमाणात रक्त न पोहोचणं) धोका वाढतो. यामुळं व्यायाम करताना शरीर जास्त थकेल असे व्यायाप्रकार टाळा. जर तुम्हाला वारंवार छातीत दुखण्याची समस्या येत असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आवश्यक चाचण्या करून घ्या.
हे वाचा -
कलर प्लेट सारखं दिसतंय हे Colourful Home, किचनपासून टॉयलेटपर्यंत भन्नाट रंगांनी सजलंय घर
कौटुंबिक मधुमेह - जर तुमच्या घरातील कोणाला मधुमेह असेल तर तुम्हालाही मधुमेह होण्याची शक्यता वाढते. 2013 मध्ये 8000 लोकांवर केलेल्या मधुमेहाच्या अभ्यासात, मधुमेह असलेल्या 26 टक्के लोकांना टाईप 2 मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असल्याचं आढळून आलं. जर तुमच्या कुटुंबातही हा आजार अनुवांशिकरित्या चालत आला असेल, तर तुमच्या रक्तातील साखर वेळोवेळी तपासत राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.