अरे हे काय! चक्क पुरुष झाले प्रेग्नंट; बेबी बम्पसह का वावरत आहेत नेते?

अरे हे काय! चक्क पुरुष झाले प्रेग्नंट; बेबी बम्पसह का वावरत आहेत नेते?

या नेत्यांच्या बेबी बम्पमागील नेमकं रहस्य काय आहे?

  • Share this:

टोकिओ, 12 एप्रिल : सध्या जपानमधील काही पुरुष नेत्यांचा (japanese leaders behave like pregnant woman) फोटो चर्चेत आहे. ज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे तीन नेते अगदी प्रेग्नंट असल्यासारखं फिरत आहेत. प्रेग्नंट महिलांसारखं ते आपलं बेबी बम्प दाखवत आहेत. खरंतर ते प्रेग्नंट नाहीतर तर त्यांनी तशा पद्धतीचं जॅकेट घातलं (japanese leaders wearing heavy jacket) आहे. पण तरी असं करण्यामागे नेमकी त्यांची भूमिका काय आहे.

जपानमधील सत्ताधारी पक्षाचे 3 नेते अत्यंत जड असे जॅकेट परिधान करून वावरताना दिसत आहेत. या जॅकेटचे वजन 7.5 किलो असून,हे जॅकेट परिधान करुन ते सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत,तसेच शॉपिंगसह घरकाम करताना देखील दिसत आहेत. त्यांना हे जॅकेट काढून ठेवण्याची मुभा केवळ अधिवेशनादरम्यानच आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जपानमध्ये (Japan) गर्भवती महिलांच्या (Pregnant Women) सन्मानार्थ तेथील नेते एक अनोखे कॅम्पेन (Campaign) राबवताना दिसत आहेत.  खरंतर हे नेते जॅकेट परिधान करून महिलांना प्रेग्नन्सी दरम्यान होणाऱ्या वेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा प्रयोग राजकारणात असेलल्या ताकाको सुजुकी यांनी सुरू केला आहे. या प्रयोगामुळे पुरुष नेत्यांना महिलांना प्रेग्नन्सीदरम्यान होणाऱ्या वेदना आणि त्रासाची जाणीव होईल, असं त्यांचं म्हणणे आहे. मसनओबू ओगुरा या जपानी नेत्याने ट्वीट केलं की या प्रयोगामुळे गर्भवती महिलांच्या अडचणी काही प्रमाणात का होईना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल.

हे वाचा - अजबच आहे! या गावात जन्माला येतात फक्त मुली; वैज्ञानिकही झाले हैराण

जगातील अन्य देशांप्रमाणे जपानमध्येही गर्भवती महिलांची कामाच्या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात नाही. ओसाका येथे राहणाऱ्या एका महिलेने व्हॉईस वर्ल्ड न्यूजशी बोलताना सांगितले की मी प्रेग्नन्सी दरम्यान खूप चिंतेत होते. मला वाटत होते की माझा गर्भपात होईल. इतका त्रास होत असून देखील मी माझ्या बॉसला सुट्टी मागण्याची हिंमत करू शकत नव्हते.

परंतु, या जॅकेटची तुलना महिलांच्या प्रेग्नन्सीशी होऊ शकत नाही. चाईल्ड केअर, महिलांचं करिअर, लैंगिक भेदभाव या प्रश्नांमध्ये जपान पिछाडीवर असून या प्रयोगानंतर पुरुष नेते यासंदर्भात ठोस धोरण (Policy)आणतील अशा आशा असल्याचं एका महिलेने म्हटलं आहे.

हे वाचा - अरेच्चा! कमालच झाली; अवघ्या 3 दिवसांचं नवजात बाळ झालं आठवी पास

याबाबत (Career Consultants) करिअर कन्सलटंट असाको निहारा म्हणतात,की जर जपानी नेते गर्भवती महिलांना पूरक ठरणारे नवे धोरण आखू शकले नाहीत तर हा प्रयोग केवळ एक परफॉर्मन्सच ठरेल आणि गर्भवती महिलांच्या स्थितीत फारसा फरक पडणार नाही. जपानमधील अनेक गर्भवती महिला ठिकपणे अन्नाचे सेवन करु शकत नाही. त्यांना योग्य पाठिंब्याची (Support)गरज असते. त्यामुळे या शासकीय अधिकाऱ्यांनी केवळ या प्रयोगात सहभागी न होता, अशा महिलांची सर्वतोपरी मदत केली पाहिजे,असे निहारा यांनी सांगितले.

First published: April 12, 2021, 11:03 PM IST

ताज्या बातम्या