Home /News /lifestyle /

4 पायांच्या प्राण्याप्रमाणे चालतात 'या' कुटुंबातील सदस्य, डॉक्टरही झाले हैराण

4 पायांच्या प्राण्याप्रमाणे चालतात 'या' कुटुंबातील सदस्य, डॉक्टरही झाले हैराण

या कुटुंबातल्या व्यक्ती चक्क हात आणि पायांचा वापर करून प्राण्यांसारखेच चालतात.

या कुटुंबातल्या व्यक्ती चक्क हात आणि पायांचा वापर करून प्राण्यांसारखेच चालतात.

या कुटुंबातल्या व्यक्ती चक्क हात आणि पायांचा वापर करून प्राण्यांसारखेच चालतात.

    मुंबई, 05 डिसेंबर : फक्त प्राणीच चार पायांवर का चालतात? माणसं त्यांचे हात आणि पायांवर का चालत नाहीत? तुमची मुलंही असे प्रश्न नक्कीच विचारत असतील, तर माणसं दोन पायांवर कशी चालतात असा विचार कदाचित प्राणीही करत असतील; पण तुम्ही कधी एखाद्या माणसाला आपल्या हात आणि पायांवर म्हणजे (Humans Walking Using Hands and Legs) प्राण्यासारखं चालताना पाहिलं आहे का? लहानपणी आपण सगळेच रांगतो; पण आम्ही तुम्हाला अशा एका परिवाराबद्दल सांगणार आहोत ज्यातले सगळे सदस्य प्राण्यांसारखे आपल्या हातापायांवरच (Family Walk Like Animals on all Fours) चालतात. या कुटुंबाबद्दल ऐकून शास्त्रज्ञही विचारात पडलेत. तुर्कस्तानमधल्या (Turkish Family Walks Using Hands and Legs) एका छोट्याशा खेड्यात हे विचित्र कुटुंब राहतं. या कुटुंबातल्या व्यक्ती चक्क हात आणि पायांचा वापर करून प्राण्यांसारखेच चालतात. हजारो वर्षांमध्ये मानवात जी उत्क्रांती झाली त्याचा यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही की काय, असंच या कुटुंबाकडे बघून वाटू शकतं. सुरुवातीला तुर्कस्तानातल्या वैज्ञानिकांनी त्याला मागास विकासाचं (Backward Evolution) नाव दिलं; पण आता मात्र या कुटुंबाबद्दल संशोधकांना अधिक माहिती मिळाली आहे. PHOTO : पूजा सावंतचा ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस अवतार, नवं फोटोशूट चर्चत! रेसिट (Resit) आणि हॅटिस उलास (Hatice Ulas) यांचा परिवार अनेक वर्षांपासून जगापासून लांब आहे. त्यांच्याबद्दल कुणालाच काहीही माहिती नव्हती. 2005 मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञानं तुर्कस्तानच्या एका प्रोफेसरचा अप्रकाशित अहवाल वाचला आणि तो थक्क झाला. या अहवालात ‘quadrupedal locomotion’ म्हणजे चार पायांवर चालणाऱ्या उलास कुटुंबीयांबाबत लिहिलं होतं. चार पायांवर म्हणजे प्राणी जसं चालतात तसं चालणं असा याचा अर्थ होतो. त्या वेळी त्यांनी यूनर टॅन सिंड्रोमचा दावा केला होता. म्हणजे, ज्यात माणसं पायांबरोबरच हाताच्या मदतीनं जनावरांसारखं चालतात. जेव्हा बॅकवर्ड इव्होल्युशन म्हणजेच मागास विकासाचा सिद्धांत इथपर्यंत येऊन ठेपला तेव्हा अर्थातच वैज्ञानिकांचं कुतुहलही वाढलं. या कुटुंबाला जेनेटिक आजार म्हणजेच जनुकांसबंधीचा आजार असल्याचं त्यानंतर लक्षात आलं. या सर्व भाऊ-बहिणींना कन्जेनायटल ब्रेन इम्पेयरमेंट आणि सेरेबेलर अॅटाक्सिया (congenital brain impairment and cerebellar ataxia) हा मेंदूशी निगडित विकार असल्याचं लक्षात आलं. या आजारात दोन पायांवर शरीराचा समतोल सांभाळणं खूप अवघड असतं. त्यामुळे हातांचीही मदत घेऊन चालावं लागतं. बँकेची कागदपत्र बाहेर काढली तर महागात पडेल, नवाब मलिकांचा दरेकरांना थेट इशारा रेसिट आणि उलास दोन पायांवरच चालत होते. त्यांच्या 19 मुलांपैकी 5 मुलं हातापायांच्या साह्यानं चालतात. 25 ते 41 वर्षं वयाच्या असलेल्या या सर्वांबद्दल जगाला समजलं आहे. आता त्यांच्याबद्दल कुतुहलानं बोललं जातं. त्याआधी त्यांना खूप अपमान सहन करावा लागला होता. ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेकही केली आहे, त्यांना शिव्याही दिल्या आहेत. या अपमानामुळेच ही भावंडं शाळेतही जाऊ शकली नाहीत. आपल्या घराच्या अवतीभवतीच ती असायची. अर्थात कामापुरती कुर्दिश भाषा त्यांना येते. या भावंडांमधला एक भाऊ हुसेन हा तर हातापायांच्या साह्यानेच कित्येक किलोमीटर चालतो. यांचा सहावा भाऊही हातापायावरच चालायचा; पण पाचव्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला. आता या कुटुंबाबद्दल बरीच माहिती उपलब्ध असली, तरी कुतूहल अजूनही कायम आहे.
    First published:

    पुढील बातम्या