Home /News /lifestyle /

मेलेनिया की इवांका : ट्रम्पची पत्नी आणि मुलीपैकी कोणाकडे आहे अधिक संपत्ती?

मेलेनिया की इवांका : ट्रम्पची पत्नी आणि मुलीपैकी कोणाकडे आहे अधिक संपत्ती?

मेलेनिया (Melania trump) या ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. तर इवांका ट्रंप (Evanka Trump) या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. या दोघींच्या वयामध्ये केवळ 10 वर्षांचं अंतर आहे.

    वॉशिंग्टन, 17 नोव्हेंबर : अमेरिकेचे परतीच्या मार्गावर असलेले विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्याबरोबर व्हाइट हाऊसमध्ये राहणाऱ्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प (Melania trump net worth) यांच्या नात्याविषयी ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी इवांका ट्रम्प (Ivanka Trump) यांच्याबरोबरच्या संबंधांविषयी नवनवीन माहिती समोर येत असते. आता निवडणुकीतल्या पराभवानंतर व्हाइट हाऊस सोडायचं निश्चित झाल्यावर मेलेनिया या ट्रम्प यांना घटस्फोट देणार अशी चर्चा आहे. त्याच दरम्यान इवांका ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या संपत्तीची तुलनाही होत आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांका या दोघीही मॉडेलिंग करत असत आणि त्यानंतर त्या व्यावसायिक झाल्या. या दोघींमध्ये कोण अधिक श्रीमंत याविषयी माध्यमांमधून चर्चा होत आहे. सेलिब्रिटी नेट वर्थ  वेबसाइट नेहमी जगभरातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीचा आढावा घेत असते. यामध्ये त्यांनी इवांका ट्रम्प आणि मेलेनिया यांच्या संपत्तीची देखील तुलना केली आहे. या दोघींच्या संपत्तीची तुलना करणं तितकंसं सोपं नव्हतं. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असल्याने या दोघीदेखील राजकीय व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची संपत्ती मोजणं सोपं नव्हतं. परंतु तरीदेखील त्यांनी मोजली. यामधून समोर आलेली संपत्ती डोळे दिपवून टाकणारी आहे. मेलेनिया यांच्याजवळ 38 मिलियन पाउंड संपत्ती आहे.  भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 3,80,31,88,690  रुपये इतकी आहे. ही मेलेनिया यांची स्वकमाई आहे. ट्रम्प यांना भेटण्याआधी मेलेनिया यशस्वी मॉडेल होत्या. व्होग, व्हॅनिटी फेअर आणि न्यूयॉर्क मॅगझिनसारख्या लोकप्रिय ब्रँडबरोबर त्यांनी काम केलं आहे. याचबरोबर त्यांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला, मेलानिया टाईमपीस असं त्याचं ब्रँड नेम आहे. यामध्ये स्टेटमेंट ज्वेलरी खूप महागड्या दराने विकली गेली. या व्यतिरिक्त, त्यांची स्किन-केयर उत्पादनांची कंपनीदेखील आहे. इवांका ट्रम्प यांची संपत्ती देखील काही कमी नाही. तिच्याकडे मेलेनिया यांच्यापेक्षा कैकपटीने संपत्ती आहे. फोर्ब्ज मॅगझिनच्या नुसार, इवांका यांच्याजवळ 289 मिलियन पाउंड इतकी संपत्ती आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 28,47,50,55,122 रुपये इतकी आहे. त्यामुळे मेलानिया यांच्याहून इवांका या खूप श्रीमंत आहेत. इवांकादेखील सुरुवातीला मॉडेल होत्या. परंतु नंतर त्यांनी पूर्णवेळ व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प स्वतःदेखील एक यशस्वी व्यावसायिक आहेत. संपूर्ण अमेरिकेत त्यांचा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. इवांकांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभा केला नाही तर वडिलांच्या व्यवसायात देखील एक्झिक्युटिव वाइस-प्रेसिडेंट आहेत. त्याचबरोबर इवांका या ट्रम्प यांच्या हॉटेलमध्ये इंटिरियर डिजायनर म्हणून देखील काम करतात. यासाठी त्यांना वेगळे पैसे मिळतात. मेलेनिया आणि  इवांका यांच्या संपत्तीच्या तुलनेबरोबरच त्यांच्या एकमेकींशी असलेल्या नात्याची देखील तुलना केली जाते. पहिल्यांदा फर्स्ट लेडी आणि फर्स्ट डॉटरमध्ये तुलना केली जात आहे. या दोघींमध्ये पॉवर गेम सुरू झाल्यामुळे नात्यामध्ये कटुता निर्माण झाली आहे. मेलेनिया यांची मैत्रीण आणि व्हाईट हाऊसमध्ये काम केलेली स्टेफनी विंस्टन वॉल्कॉफ यांनी देखील दावा केला आहे, मेलेनिया नेहमी  इवांकांविषयी तिच्याकडे तक्रार करत असे.  इवांका तिला आदर आणि सन्मान देत नसल्याची तिची भावना होती. त्यांच्या दाव्यानुसार मेलेनिया यांनी Operation Block Ivanka राबवले होते. त्याचबरोबर इवांकाला माध्यमांत कमी प्रसिद्धी मिळावी यासाठी देखील मेलेनिया प्रयत्न करत असत. मेलेनिया या ट्रम्प यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. तर इवांका ट्रंप या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. या दोघींच्या वयामध्ये केवळ 10 वर्षांचं अंतर आहे. दोघीही खूप ग्लॅमरस अवतारात वावरत असतात. त्यामुळे अमेरिकी माध्यमांमध्ये देखील दोघींची तुलना होत आहे.
    First published:

    Tags: Donald Trump

    पुढील बातम्या