Home /News /lifestyle /

Mediterranean आहार म्हणजे काय? या आहारामुळे मधुमेहाचा धोका कसा कमी होतो?

Mediterranean आहार म्हणजे काय? या आहारामुळे मधुमेहाचा धोका कसा कमी होतो?

मेडीटेरियन आहार अतिस्थूल महिलांमधील टाईप टू डायबेटीसचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

    मुंबई, 24 नोव्हेंबर : मेडीटेरियन आहार अतिस्थूल महिलांमधील टाईप टू डायबेटीसचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या आहारात ओलिव्ह ऑईल, फळे, भाज्या, शेंगा, मासे, नट्स आणि बियांचा समावेश असतो. ब्रिगहॅम आणि मॅसेच्युसेटमधील बोस्टनमध्ये असलेल्या वूमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेलं हे संशोधन जामा नेटवर्क ओपनमध्ये १९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार, महिलांनी मेडिटेरियन डाएटचे पालन केले तर डायबेटिस होण्याचा धोका 30 टक्के कमी होऊ शकतो. वूमन्स हेल्थ स्टडी (WHS) उपक्रमातील २५ हजार महिला या अभ्यासात सहभागी झाल्या होत्या. त्यावरून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या महिलांच्या शरीरातील इन्श्युलीन रेझिस्टन्स, बॉडी मास इंडेक्स, लिपोप्रोटीन, जळजळ, चयापचय आदी घटकांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यासाठी १९९२ ते १९९५ दरम्यान यात सहभागी झालेल्या महिलांची डिसेंबर २०१७ मध्ये माहिती जमा करण्यात आली होती. व्हिटॅमीन ईचा परिणाम आणि अस्प्रिनचा कमी डोस याचा प्रभाव हृदयविकार आणि कर्करोग याचा धोका कमी करू शकतात का, याचा अभ्यास यात करण्यात आला. त्याचबरोबर सहभागी महिलांना त्यांचा आहार, जीवनशैली, वैद्यकीय इतिहास आदी बाबतही माहिती विचारण्यात आली होती. या अभ्यासाच्या सुरुवातीलाच त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. २५ हजार सहभागीपैकी २ हजार ३०७ महिलांना टाईप टू डायबेटिस झाला होता. त्यातील २५ पेक्षा अधिक बॉडी मास इंडेक्स असणाऱ्या अतिस्थूल महिलांमध्ये इन्श्युलीन रेझिस्टन्स सुधारल्याचं दिसून आलं. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या सहायक प्राध्यापक डॉ. सामिया मोरा म्हणाल्या,‘आहारात सुधारणा करून टाईप टू डायबेटिस असलेल्या व्यक्ती विशेषतः अतिस्थूल महिला या आजाराची जोखीम कमी करू शकतात. त्या ब्रिगहमच्या प्रिव्हेंटीव्ह मेडिसीन आणि कार्डिओव्हस्क्युलर मेडिसीन विभागातही काम करतात. त्या पुढे म्हणाल्या, चयापचय प्रकियेत कमी वेळेत बदल झाला. मात्र अनेक वर्षांसाठी सुरक्षा हवी असेल तर, दीर्घकाळ आहारात बदल करणे आवश्यक आहे, असे हा अभ्यास सुचवतो. मेडिटेरियन डाएट हृदयविकार, कर्करोग आणि वयाशी संबधित आजारांची जोखीम कमी करण्यातही उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखद्या व्यक्तीने आपल्या आहारात केलेला बदल त्याचे आरोग्य सुधारू शकतो, हे या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या