पत्रिका आणि मनं जुळली, मात्र सुखी संसारासाठी लग्नाआधी ‘या’ मेडिकल टेस्टही जरूरी

ज्या व्यक्तीसह तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य काढायचं आहे, त्या जोडीदाराच्या (Couple) आरोग्याबाबत तुम्हाला माहिती असायलाच हवी. त्यामुळे लग्नाआधी या मेडिकल टेस्ट (Medical test) करून घ्या.

  • Share this:

लग्न ठरल्यानंतर लग्नाची तयारी तर तुम्ही करता मात्र लग्नाआधी तुम्ही तुमच्या मेडिकल टेस्ट केल्यात का? नसेल तर लगेच करून घ्या. कारण पत्रिका आणि मनं जुळणं जितकं गरजेचं आहे, तितकंच मेडिकल टेस्टही. ज्यामुळे लग्नानंतर तुमच्या संसारात कोणत्या समस्या येणार नाहीत. लग्नाआधीच आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत जाणून घ्या.

ब्लड ग्रुप कम्पॅटिबिलिटी टेस्ट (Blood group compatibility test) - लग्नानंतर लगेचच तुम्ही बेबी प्लॅनिंग करण्याचं ठरवलं असेल, तर दोघांनीही ही चाचणी करणं खूप गरजेचं आहे. या चाचणीमार्फत तुमच्या आणि तुमच्या होणाऱ्या जोडीदाराचं आरएच फॅक्टर (Rh factor किंवा Rhesus factor) समजून येईल. बाळासाठी दोघांचंही फॅक्टर सारखं असणं गरजेचं असतं. जर तुमच्या दोघांचंही ब्लड ग्रुप एकमेकांसोबत कम्पॅटेबल नाही झालं तर प्रेग्नन्सीमध्ये समस्या येऊ शकतात आणि ही समस्या दुसऱ्या मुलासाठी जास्त धोकादायक ठरू शकते. अशी परिस्थिती निर्माण होते की गरोदर महिलांच्या रक्तातील अँटिबॉडीज तिच्या मुलाच्या रक्तातील पेशींनाच मारतात.

इन्फर्टिलिटी टेस्ट (Infertility test) - आपली प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी ही टेस्ट खूप महत्त्वाची आहे. इन्फर्टिलिटी टेस्टचे तशी काही स्पष्ट लक्षणं नाहीत. मात्र जर तुम्ही लग्नाआधीच ही टेस्ट केली आणि तुम्हाला लग्नानंतर लगेच मूल हवं असेल, तर त्यादृष्टीने उपचार करता येतात. मूल होत नाही यासाठी एकमेकांना दोष दिल्यानं नातं तुटू शकतं.

जेनेटिकली ट्रान्समिटेड कन्डिशन टेस्ट (Genetically transmitted conditions test) - अनुवंशिकतेने होणाऱ्या आजारांची चाचणीही करायला हवी. जेणेकरून उपचार लवकरात लवकर होतील. अनेकदा लग्नानंतर अशा आजारांबाबत समजतं आणि जोडीदारालाही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, कोलोन कॅन्सर, किडनीसंबंधित आजार आणि डायबेटिजसारख्या काही आजारांचा समावेश होऊ शकतो. या आजारांचं उपचार शक्य आहे, त्यामुळे लग्नाआधी चाचणी करा नाहीतर भविष्यात तुमचं मोठं नुकसान होईल.

एसटीडी टेस्ट (STD test) सध्याच्या घडीला लग्नाआधीच शारीरिक संबंध ठेवणं अनेकांसाठी सामान्य झालं आहे. त्यामुळे लैंगिक संक्रमित आजारांची चाचणी करणं गरजेचं आहे. यामध्ये एचआयव्ही, स्किन इन्फेक्शन, हेपेटायटिस अशा आजारांचा समावेश आहे. यापैकी काही आजार धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे लग्नाआधी एसटीडी म्हणजेच सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजची चाचणी जरूर करून घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 08:26 PM IST

ताज्या बातम्या