VIDEO : हा रोबो तुमच्यासाठी घरी जेवण बनवून ठेवू शकतो!

VIDEO : हा रोबो तुमच्यासाठी घरी जेवण बनवून ठेवू शकतो!

बंगळुरूच्या आयटी हबमध्ये आता तुमच्यासाठी जेवण बनवून ठेवणारा एक मेकॅनिकल शेफ तयार होतोय. या मशिनमध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते खाद्यपदार्थ भरून त्याच्याकडून रेसिपी बनवून घेऊ शकता.

  • Share this:

बंगुळुरू, 9 जुलै : तुम्ही ऑफिसमध्ये काम करता आहात... हे काम कधी संपणार ते तुम्हाला माहीत नाही. मग भुकेल्या पोटी ट्रॅफिकमधून वाट काढत घरी जायचं आणि मग जेवण बनवायचं.

पण कल्पना करा... घरी कुणीच नाहीये आणि तरीही तुम्ही फोन करून आज तुम्हाला काय खायला आवडेल हे सांगायचं आणि तुम्ही घरी जाल तेव्हा तुमच्यासाठी जेवण तयार असेल !

ही नुसती कल्पना नाही. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये आता तुमच्यासाठी जेवण बनवून ठेवणारा एक मेकॅनिकल शेफ तयार होतोय.

जेवण बनवणाऱ्या या मशिनमध्ये 100 पेक्षा जास्त भारतीय रेसिपी बनवता येतात. जी रेसिपी तुम्हाला बनवून हवी आहे ती या मशिनमध्ये प्रोग्रॅम करता येते. तुम्ही ऑफिसमधून घरी फोन करूनही हे मशिन प्रोग्रॅम करू शकता.

बंगळुरू आयटी हबमध्ये कोहेन कार्लोस आणि अर्पित हे दोन शेफ या मेकॅनिकल शेफची निर्मिती करत आहेत.

रेसिपी करा प्रोग्रॅम

या मशिनमध्ये तुम्ही तुम्हाला हवे ते खाद्यपदार्थ भरून त्याच्याकडून रेसिपी बनवून घेऊ शकता. यामध्ये एक स्पाइस बॉक्स आहे. त्यात मसाले भरता येतात. शिवाय पाणी आणि तेलही भरून ठेवता येतं. ते वापरून हा शेफ तुमच्यासाठी जेवण बनवतो.

या रोबो शेफ खूप महागडा आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका. सध्या या मशिनची किंमत 40 हजार रुपये आहे पण त्याची किंमत आणखी कमी करण्याचाही या दोघांचा विचार आहे.

अमेरिकेत पूर, व्हाईट हाऊसमध्ये शिरलं पाणी!

शिवाय आत्ता हा रोबो काहिसा बोजड वाटतो आहे पण याचं रूप बदलून एका मोठ्या मायक्रोवेव्हसारखं करण्याचाही या संशोधक शेफचा प्रयत्न आहे.

त्यांच्या या प्रयत्नानंतर हा रोबो शेफ दिसेलही सुंदर आणि तुमच्यासाठी जेवणही अगदी चवदार बनवेल.

==============================================================================================

SPECIAL REPORT: पाकिस्तानातील बैलगाडीचा हा थरार पाहिला का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2019 03:40 PM IST

ताज्या बातम्या