मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लहानग्यांना जपा! राज्यात गोवरचा उद्रेक सुरूच, मुंबईत 12 मुलांचा मृत्यू, तीन हजारांहून अधिक रुग्ण

लहानग्यांना जपा! राज्यात गोवरचा उद्रेक सुरूच, मुंबईत 12 मुलांचा मृत्यू, तीन हजारांहून अधिक रुग्ण

राज्यात गोवरचा उद्रेक सुरूच

राज्यात गोवरचा उद्रेक सुरूच

Measles Outbreak in Mumbai: 17 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात गोवराच्या 500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 23 नोव्हेंबर : कोरोना संसर्ग कमी झालेला असताना राज्यासमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. राज्यात गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक बालकांचा सातत्याने मृत्यू झाला असून अजूनही मोठ्या संख्येने मुले रुग्णालयात दाखल आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक परिणाम राजधानी मुंबईत झालेला पाहायला मिळत आहे. बीएमसीच्या माहितीनुसार, शहरात एकूण 3208 लक्षणे असलेले रुग्ण समोर आले आहेत, त्यापैकी एकूण 220 रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

मुंबईत बुधवारी गोवरच्या प्रादुर्भावामुळे 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला असून, या आजाराने शहरातील मृतांची संख्या 12 झाली आहे. सोमवारी मुंबईत सर्वाधिक 24 रुग्ण आढळले. त्याचबरोबर गोवंडी आणि कुर्ला येथेही सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. बहुतांश आजारी मुले 5 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.

वाचा - शरीरातील युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करतात ‘या’ बिया; आहारात समावेश केल्यास खूप फायदा

संपूर्ण महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णांबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, केवळ मुंबईतच नाही तर बाहेरही गोवरचा प्रादुर्भाव वाढत आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात या आजाराच्या 500 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये 7 आणि नाशिकच्या मालेगावमध्ये 5 रुग्ण आढळले आहेत. आकडेवारीनुसार, संपूर्ण राज्यात 2019 मध्ये 153, 2020 मध्ये 193 आणि 2021 मध्ये 92 प्रकरणे नोंदवली गेली. नवी मुंबईबद्दल बोलायचे झाले तर पनवेलमध्ये 3 रुग्ण आणि 15 रुग्णांमध्ये गोवरची लक्षणे आढळून आली असून, त्यानंतर पनवेलमध्ये 300 ठिकाणी लसीकरण करण्यात आले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, निकृष्ट राहणीमान, मोठी कुटुंबे, आरोग्य सेवांचा अभाव, स्वच्छतेच्या सुविधा आणि पोषणाचा अभाव, कमी प्रतिकारशक्ती, लसीकरण न करणे आणि लसीकरणाची अनास्था ही शहरातील आजार पसरण्याची काही प्रमुख कारणे आहेत. महाराष्ट्र आरोग्य संनियंत्रण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले की, एका आठवड्यात संसर्गाची पाच संशयित प्रकरणे आढळतात, त्यापैकी दोनहून अधिक प्रयोगशाळेतील चाचणीत पुष्टी झाली असेल, तर त्याला उद्रेक म्हणतात. राज्य बुलेटिननुसार, आरोग्य विभाग गोवरसाठी घरोघरी तपासणी करत आहे. मोहिमेचा एक भाग म्हणून विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे.

First published:

Tags: Health, Health Tips