मैलाच्या दगडाचे रंग आणि त्यांचा अर्थ

मैलाच्या दगडाचे रंग आणि त्यांचा अर्थ

या सगळ्या रंगांचा वेगवेगळा अर्थ आहे. ही माहिती खरं तर आपल्याला प्रवासासाठी महत्त्वाची आहे. जे आपल्याला योग्य संकेत देतात.

  • Share this:

24 आॅक्टोबर : जेव्हा आपण कुठे फिरायला जातो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या बाजूला अनेक मैलाचे दगड (माईल स्टोन) दिसतात. जे आपल्याला शहराचं नाव आणि त्याचं अंतर दर्शवतात. या दगडांना नीट पाहिलं तर लक्षात येईल की हे दगड वेगवेगळ्या रंगात आपल्याला पहायला मिळतील. जसे काळा, पिवळा, हिरवा, पांढरा, इत्यादी. परंतु या रंगांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

दगडांच्या रंगाबाबत अनेक लोकांना फारसं माहित नाही आहे. पण या सगळ्या रंगांचा वेगवेगळा अर्थ आहे. ही माहिती खरं तर आपल्याला प्रवासासाठी महत्त्वाची आहे. जे आपल्याला योग्य संकेत देतात.

नारंगी-पांढरा दगड

प्रवासाच्या दरम्यान आपण रस्त्याच्या किनाऱ्याला अनेक नारंगी-पांढऱ्या रंगाचे दगड पाहिले असतील. तर त्याचा अर्थ असा होतो की तो रस्ता 'प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने'अंतर्गत येतो. महामार्गापासून कोणत्या तरी गावाला जाणारा तो रस्ता आहे.

पिवळा-पांढरा दगड

प्रवासादरम्यान रस्त्यावर पिवळा-पांढऱ्या रंगाचा माईल स्टोन दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत आहात. पिवळा-पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड हा राष्ट्रीय महामार्गासाठी वापरले जातात.

हिरवा-पांढरा दगड

रस्त्याच्या किनाऱ्यावरील हिरवा-पांढऱ्या मैलाचा दगड अर्थ असा होतो की, आपण राज्य महामार्गावरून प्रवास करत आहोत. या रस्त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते.

निळा किंवा पांढरा दगड

प्रवासादरम्यान जेव्हा आपल्याला निळा-पांढरा किंवा काळा-पांढरा रंगाचा दगड दिसतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, एखाद्या मोठ्या शहराच्या तुम्ही जवळ आहात. हा रस्ता त्या शहराच्या जिल्ह्याच्या अंतर्गत असतो.

First published: October 24, 2017, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading