रात्री पडणाऱ्या स्वप्नांचे 'असे' असतात अर्थ

रात्री पडणाऱ्या स्वप्नांचे 'असे' असतात अर्थ

झोपणं जितकं नैसर्गिक आहे, तितकंच स्वप्नं बघणंही. जेव्हा लोक गाढ झोपतात तेव्हाच त्यांना स्वप्नं पडतात.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : झोपणं जितकं नैसर्गिक आहे, तितकंच स्वप्नं बघणंही. जेव्हा लोक गाढ झोपतात तेव्हाच त्यांना स्वप्नं पडतात. म्हणूनच अनेकदा ते झोपेतून दचकून उठतात. अचानक जाग येऊन ते संभ्रमात पडलेले दिसतात. पण तुम्हाला माहीत आहे का, स्वप्नं का पडतात? चांगली आणि वाईट तशी पडतात? त्यांचा अर्थ काय असतो?छोट्या बाळांनाही स्वप्न पडतात.पण ती ब्लॅक अँड व्हाइट असतात.  त्यांना पडणारी स्वप्न बऱ्याचदा पुढच्या येणाऱ्या अनुभवांशी निगडित असतात. त्यात रंग भरणं कठीण असतं. सर्वसाधारणपणे व्यक्तीला रात्री 4 ते 5 स्वप्नं पडू शकतात. पण ती सगळी कधीच लक्षात रहात नाहीत. आपल्या मेंदूत न्युरोकेमिकल कंडिशन्स असतात. त्यामुळे 95 ते 99 टक्के स्वप्नं विसरली जातात.

रोज पांढरा भात खात असाल तर 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

रात्रीस खेळ चाले : अण्णांच्या गावजेवणात विषबाधा होता होता 'अशी' टळली

काही जणांना स्वप्नात त्यांचं भविष्य दिसतं. पुढे काय होणार हे त्यांना दिसतं. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचा मेंदू जास्त कार्यरत असतो. आपली झोप अनेक स्टेजमध्ये असते. स्टेज 1 आणि स्टेज 4 म्हणजे नाॅन आरईएम स्लीप आणि स्टेज 5 आरईएम स्लीप असते. त्यात स्वप्नं पाहिली जातात.

भीतिदायक स्वप्नं ही स्टेज 5मध्ये दिसतात. या स्टेजमध्ये आपलं मेंदूवर सर्वात कमी नियंत्रण असतं. अनेकदा अंध लोकांना जास्त घाबरवणारी स्वप्नं पडत असतात.

संशोधकांच्या मते चांगल्या स्वप्नांपेक्षा वाईट स्वप्न जास्त पडतात. ज्या व्यक्ती स्वत:ला असुरक्षित समजतात, त्यांना तशी स्वप्नं पडतात. आपल्याला पाच मिनिटंच स्वप्न पडतात. जवळजवळ 10 मिनिटांनंतर 90 टक्के स्वप्न विसरली जातात. म्हणून लोकांच्या स्वप्नं लक्षात राहात नाहीत.

First published: March 25, 2019, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading