Home /News /lifestyle /

येथे वाचा या आठवड्यातील सर्व शुभमुहूर्तांची यादी; लग्नासाठी आहेत सर्वात जास्त शुभ दिवस

येथे वाचा या आठवड्यातील सर्व शुभमुहूर्तांची यादी; लग्नासाठी आहेत सर्वात जास्त शुभ दिवस

या आठवड्यात खरेदीसाठी 3, नामकरण समारंभासाठी 4 आणि जनेयूसाठी केवळ 2 शुभ मुहूर्त मिळत आहेत. या आठवड्यातील मुख्य शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.

    मुंबई, 16 मे : मे 2022 चा तिसरा आठवडा रविवार 15 मे पासून सुरू झाला आहे, तो शनिवार 21 मे रोजी पूर्ण होईल. या सप्ताहात गृहप्रवेशासाठी (Shubh Muhurat) दोनच दिवस शुभ आहेत. लग्नासाठी एकूण 6 शुभ मुहूर्त आहेत, तर मुंडन समारंभासाठी कोणताही मुहूर्त नाही. या आठवड्यात खरेदीसाठी 3, नामकरण समारंभासाठी 4 आणि जनेयूसाठी केवळ 2 शुभ मुहूर्त मिळत आहेत. या आठवड्यातील मुख्य शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया. मे 2022 तिसऱ्या आठवड्याचा शुभ मुहूर्त मे 2022 लग्नाचा मुहूर्त - मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लग्नासाठी 06 शुभ मुहूर्त आहेत. तुम्हाला स्वतःसाठी किंवा इतर कोणासाठी लग्नाचा शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर तुम्ही 15 मे, 17 मे, 18 मे, 19 मे, 20 मे आणि 21 मे यापैकी कोणताही एक दिवस ठरवू शकता. सातपैकी सहा दिवस लग्नासाठी मुहूर्त आहे. मे मधील गृह प्रवेश मुहूर्त - जर तुम्हाला या आठवड्यात तुमच्या नवीन घरात प्रवेश करायचा असेल आणि गृहप्रवेशाची शुभ तारीख जाणून घ्यायची असेल, तर या कामासाठी 16 मे आणि 20 मे हे दिवस चांगले आहेत. 16 मे, सोमवार वेळ: 01:18 PM ते 05:30 AM (दुसऱ्या दिवशी) 20 मे, शुक्रवार वेळ: सकाळी 05:27 ते संध्याकाळी 05:31 मे 2022 मुंडन मुहूर्त - या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मुलाच्या मुंडण समारंभासाठी कोणताही शुभ मुहूर्त पाहायचा असेल, तर या 7 दिवसांत कोणताही शुभ मुहूर्त नसल्याने तुमची निराशा होईल. यासाठी तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. मे 2022 खरेदीचा मुहूर्त - मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घर, वाहन, प्लॉट, फ्लॅट किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर 15 मे, 16 मे आणि 19 मे हे तीन दिवस खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहेत. या तीन दिवसांत तुम्ही खरेदीशी संबंधित बयाणा किंवा पैशाचे व्यवहार करू शकता. हे वाचा - चटणी आणि औषधी गुणधर्माशिवाय पुदिन्याचा घरात इतक्या कामांसाठी आहे उपयोग मे 2022 जनेऊ मुहूर्त - ज्यांना आपल्या मुलांसाठी उपनयन किंवा जनेयू संस्कार करायचे आहेत, त्यांच्यासाठी दोन दिवस शुभ आहेत. एक 18 मे रोजी आणि दुसरा 20 मे रोजी. या दोन्ही दिवशी जनेयूसाठी शुभ मुहूर्त मिळत आहे. 18 मे, बुधवार वेळ: सकाळी 08:57 ते दुपारी 01:18 20 मे, शुक्रवार वेळ: सकाळी 05:28 ते दुपारी 04:19 हे वाचा - आंबा खाल्ल्यानं वजन कमी होतं का? एका दिवसात नेमके किती आंबे खाणे आहे योग्य मे 2022 नामकरण मुहूर्त - या आठवड्यात जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नामकरण करायचे असेल तर त्यासाठी चार दिवस शुभ आहेत. तुम्ही 16 मे, 17 मे, 20 मे किंवा 21 मे यापैकी कोणत्याही दिवशी नामकरण समारंभ करू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Personal life

    पुढील बातम्या