‘शादी डॉट कॉम’ वादात, जातीय भेदभाव केल्याचा आरोप

‘शादी डॉट कॉम’ वादात, जातीय भेदभाव केल्याचा आरोप

शादी डॉट कॉमने (Shaadi.com) जातीय भेदभाव केल्याचा आरोप ब्रिटनमध्ये (Britain) करण्यात आला आहे. भारतीयांना आपला जीवनसाथी शोधण्यासाठी हे सर्वात मोठं माध्यम आहे.

  • Share this:

लंडन, 3 फेब्रुवारी : अनेक भारतीयांना आपला जीवनसाथी निवडण्याची सर्वात मोठी वेबसाईट (Website) ती म्हणजे शादी डॉट कॉम (Shaadi.com). भारतातील ही प्रमुख मॅट्रिमोनियल वेबसाईट (matrimonial websites) आहे. मात्र ही वेबसाईट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ब्रिटनमध्ये (Britain) या वेबसाईटवर जातीय भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनुसूचित जातीच्या (एससी) समाजासह भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संडे टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, उच्च जातीच्या व्यक्तीच्या प्रोफाइलवर अनुसूचित जातीच्या व्यक्तीचा पर्याय तोपर्यंत येत नाही, जोपर्यंत तो व्यक्ती इतर सर्व जातींचा पर्याय निवडत नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

भारतात जातीय भेदभाव बेकायदा आहे, शिवाय मॅट्रिमोनियल वेबसाईटने केलेला जातीय भेदभाव म्हणजे ब्रिटनच्या समानता कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं. असा इशारा एका वकिलाने दिला आहे.

हेदेखील वाचा - लग्नानंतर जोडीदारापासून दूर राहा… सुखी संसाराचा मंत्र लक्षात ठेवा

शादी डॉट कॉमने आरोपाचं केलं खंडन

शादी डॉट कॉमने मात्र जातीय भेदभाव केल्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे. कारण समुदायासाठी असलेली सेंटिग भेदभावपूर्ण नसल्याचं वेबसाईटनं म्हटलं आहे.

वेबसाईटच्या प्रवक्त्याने संडे टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करत नाही आहोत. आमची वेबसाईट कोणत्याही समाज किंवा जातीय भेदभाव करत नाही. व्यक्तीचा समाज किंवा जात कोणतीही असो, प्रत्येक व्यक्तीला समान संधी दिली जाते"

हेदेखील वाचा - Live-in relationship मध्ये राहण्याचा विचार, Side effects जरूर वाचा

First published: February 3, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या