Love Story : या सेलिब्रिटींची काय आहे स्थिती, ज्यांचा जोडीदार आहे पाकिस्तानी

अशा अनेक सेलिब्रिटी जोड्या आहेत, ज्यांचे जोडीदार पाकिस्तानी आहेत. तणावाच्या या परिस्थितीत त्यांची स्थिती कशी असते?

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 11:55 PM IST

Love Story : या सेलिब्रिटींची काय आहे स्थिती, ज्यांचा जोडीदार आहे पाकिस्तानी

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं 2010मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं. पण दोन्ही देशांमध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा सानियाच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. आताही पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सानियानं लोकांना राग पसरवण्याऐवजी शांततेसाठी प्रार्थना करा, असं आवाहन केलं, तेव्हा ती ट्रोल झाली. तेव्हा तिला आपल्यालाही या हल्ल्यानं दु:ख झालंय, हे सांगावं लागलं. पण प्रश्न असा आहे की नेहमीच सेलिब्रिटींना प्रश्नांच्या तोफांना तोंड द्यावं लागतं.

 नोनिता लाल आणि फैजल कुरैशी. दोघंही गोल्फपटू. फैजल पाकिस्तानाचा. दोघांची ओळख इस्लामाबादेत गोल्फ इव्हेंटला झाली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. पण फैजल पाकिस्तानी असल्यानं त्याला दिल्लीत राहणं कठीण जायला लागलं. काही दिवस तो श्रीलंकेत राहात होता. आता दोघं दिल्लीत स्थायिक झालेत. त्यांना मुलगाही आहे. भारत-पाकिस्तामधल्या तणावाचा त्यांच्या आयुष्यावर आता परिणाम होत नाही.

ही जोडी आहे सोन्या जहां आणि विवेकची. सोन्या पाकिस्तानची गायिका नूरजहाँची नात. सोन्यानं बाॅलिवूडचा सिनेमा लाहोरमध्ये काम केलंय. तिची भेट मुंबईच्या विवेक नारायण या बँकरशी झाली. दोघांनी लग्न केलं आणि आता ते मुंबईत राहतात.

Loading...

हे आहेत सलमान तासीर आणि तवलीन सिंह. तवलीन लंडनला होत्या तेव्हा पाकिस्तानचे राजकीय तज्ज्ञ सलमान तासीर यांच्याशी भेट झाली. दोघं प्रेमात पडले आणि लग्न केलं. सलमान पाकिस्तानच्या पंजाबचे गव्हर्नरही होते. दोघांना मुलगा झाला. सलमान यांचं आधीही लग्न झालं होतं. तवलीन आणि सलमान यांचं लग्न फारसंं टिकलं नाही. आता तवलीन आपल्या मुलासोबत दिल्लीला राहतात. सलमान यांची हत्या त्यांच्या बाॅडीगार्डनंच केली.

सानिया मिर्झा म्हणते, दरवेळी सेलिब्रिटींनी अशा घटना घडल्या की निषेध व्यक्त केल्या नाही, तर त्यांच्यावर टीका होते, हे चुकीचं आहे. सध्या सानिया आणि शोएब दुबईत राहतात. सानिया कधीतरी पाकिस्तानात आपल्या सासरी जाते. लग्नानंतर तिनं भारताचं प्रतिनिधित्व करून अनेक पदकं जिंकलीयत.

जहीर अब्बास आणि रीता लुथरा यांची कहाणी ही पाकिस्तानचे पती आणि भारतीय पत्नी अशी आहे. फाळणीपूर्वी दोघांचं कुटुंब पाकिस्तानात राहायचं. फाळणीनंतर रीता यांचं कुटुंब कानपूरला स्थायिक झालं. तिथले ते मोठे व्यापारी आहेत. दोन्ही कुटुंबात मैत्री होती 80च्या दशकात जहीर पाकिस्तान क्रिकेट टीमबरोबर भारतात आले तेव्हा कानपूरला भेटायला गेले. त्यानंतर रीता आणि त्यांच्या भेटी लंडनला सुरू झाला. दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना विरोध झाला नाही.

रीना यांनी लग्नानंतर धर्म बदलून त्या समीना अब्बास बनल्या. त्यांचा कराचीत इंटिरियरचा बिझनेस आहे. त्या म्हणतात, दोन्ही देशांमध्ये जेव्हा तणाव असतो, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. भारताची म्हणून अनेकदा माझ्याकडे शंकेनं पाहिलं जातं. दोघांची मुलगी सोनलचं लग्न दिल्लीतल्या बिझनेसमनशी केलं गेलं. ती भारतात राहते.

80च्या दशकात रीना राॅय आणि मोहसीन खाननं लग्न केलं होतं. त्यावेळी रीनाचं सिनेमातलं करियर खूप चांगलं चाललेलं. लग्नानंतर ती पाकिस्तानात गेली. पण बाॅलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा तिला गप्प बसवेना. म्हणून ती भारतात परतली. तिच्यासोबत मोहसीनही आला. दोघांनी सिनेमात काम सुरू केलं. पण मोहसीन चालला नाही. दोन्ही देशांतल्या तणावामुळे दोघांना घटस्फोट घ्यावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 12:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...