चेन्नई, 08 जुलै : आतापर्यंत तुम्ही आलू पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा, कांदा पराठा असे वेगवेगळे पराठे खालले असतील. मात्र मास्क पराठा खाल्लात का?. कोरोना काळात आता तुमच्या ताटात तुम्हाला मास्क पराठा दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण तामिळनाडूतल्या मदुराई रेस्टॉरंटमध्ये (Madurai restaurant) असा मास्क पराठा (mask parottas) मिळतो आहे.
मदुराईतील टेम्पल सिंटी या प्रसिद्ध रेस्टॉरंटने हा मास्क पराठा तयार केला आहे. कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क महत्त्वाचा आहे आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा मास्कसारखा पराठा तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा असा संदेश या निमित्ताने दिला जातो आहे.
पराठा मास्टर एस. सथीश यांनी सांगितलं, "पारंपारिक पराठ्याला सर्जिकल मास्कचा आकार दिला आहे. आम्ही त्याला एका विशिष्ट पद्धतीने फोल्ड केलं आहे आणि त्याला दोन्ही बाजूंना हँडल्स लावलेत. या पराठ्यासाठी वापरण्यात आलेली सामग्री सारखीच आहे. फक्त आकार बदलला आहे"
हे वाचा - MASK नाही घातला तर काय? VIDEO पाहाल तर तुम्ही चेहऱ्यावरील मास्क कधीच हटवणार नाही
"आमचा हा प्रयोग यशस्वी होताना दिसतो आहे. मदुराईतील बहुतेक लोकं मास्क घालत नाहीत मात्र प्रत्येकाला मास्क पराठा आवडला आहे. फक्त मोठी माणसंच नाही तर लहान मुलंही याच्या प्रेमात पडलीत. सध्या दोन पराठ्यांची किंमत 50 रुपये आहे", असं सथीश यांनी सांगितलं.
आतापर्यंत तुम्ही बरेच मास्क पाहिलेत. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क महत्त्वाचा असल्याने आता मास्क लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. त्यामुळे लोक आपापल्या परीने मास्क वापरत आहेत. कुणी सोन्याचा, कुणी चांदीचा, कुणी कापडी मॅचिंग मास्क, कुणी विचित्र आकाराचे मास्क वापरत आहेत. मात्र मास्क आता फक्त फॅशनमध्येच नाही तर फूडमध्येही दिसून आला आहे.
हे वाचा - कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया
कोरोना काळात अशा विचित्र आकाराचे पदार्थ वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये बनवले जाऊ लागले. याआधी व्हिएतनाममध्ये कोरोनाव्हायरसच्या आकाराचा बर्गर आला त्यानंतर कोलकात्यामध्ये कोरोनाव्हायरसच्या आकाराची मिठाईदेखील आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.