नवी दिल्ली, 25 डिसेंबर : कोरोना विषाणूपासून (Corona Visrus)बचाव करण्यासाठी मास्क (Mask)आवश्यकच आहे, पण फक्त मास्क लावणं पुरेसं नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी एका अभ्यासानंतर केला आहे. मास्क लावल्यानंतर तुम्ही सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) अर्थात सुरक्षित शारीरिक अंतर पाळत नसाल तर संसर्ग होण्याचा धोका वाढतो, असं या अभ्यासात आढळून आलं आहे. कोविड 19 ची (Covid 19)साथ सुरू झाल्या क्षणापासूनच आरोग्य यंत्रणा (Health Agencies) मास्क वापरण्यावर भर देत आहेत.
एआयपी पब्लिशिंगनं (AIP Publishing) प्रकाशित केलेल्या फिजिक्स ऑफ फ्लुइडसमध्ये शास्त्रज्ञांनी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मास्कचा अभ्यास केला. वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार करण्यात आलेले हे मास्क खोकल्यावर किंवा शिंक आल्यावर बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्सना कसे आणि किती प्रमाणात रोखतात याचा अभ्यास करण्यात आला. यात असे लक्षात आले की, प्रत्येक मटेरियलमध्ये ड्रॉपलेट्सची संख्या कमी झाली मात्र दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांपेक्षा कमी अंतर असेल तर बाहेर पडणारे काही ड्रॉपलेट्स संसर्गाचे कारण बनू शकतात.
हे वाचा - राज्यावर नव्या Coronavirus चं सावट! UK हून 45 नागरिक थेट कल्याणमध्ये
या अभ्यासात सहभागी असलेले न्यू मेक्सिको स्टेट युनिव्हर्सिटीतील (New Mexico State University) सहायक प्रोफेसर कृष्णा कोटा (Krishna Kota) म्हणाले, ‘ या विषाणूच्या संसर्गापासून रोखण्यासाठी मास्क नक्कीच मदत करू शकतो, मात्र लोक एकमेकांच्या अगदी जवळ असतील तर विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळं या विषाणूपासून सुरक्षित रहायचं असेल तर फक्त मास्क वापरून चालणार नाही तर मास्कबरोबर सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यंत आवश्यक आहे.
हे वाचा - एकदा Covid-19 होऊन गेला असला तरी पुन्हा होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग?
कसा करण्यात आला अभ्यास : या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी एक मशीन तयार केलं. जी एअर जनरेटरच्या सहाय्यानं माणसाच्या खोकण्याची किंवा शिंकण्याची नक्कल करते. कॅमेरा बसवलेल्या एका हवाबंद ट्यूबमध्ये या जनरेटरच्या सहाय्यानं लेजरद्वारे ड्रॉपलेट्स सोडण्यात आले. सर्व प्रकारच्या मास्कनी मोठ्या प्रमाणात ड्रॉपलेट्सना रोखलं. मात्र 6 फुटांपेक्षा कमी अंतर असेल तर अगदी अल्प प्रमाणात मास्कमधून बाहेर पडणारे ड्रॉपलेट्स या आजाराचा संसर्ग घडवण्यास पुरेसे ठरू शकतात. एखादी कोविड 19 बाधित व्यक्ती अनेकदा शिंकली किंवा खोकली तर ते अधिक धोकादायक ठरू शकतं. एका शिंकेतून विषाणूचे 20 कोटी कण बाहेर पडू शकतात. त्यामुळं मास्क मधून बाहेर पडणारे थोडेसे कणदेखील कमी अंतरावर उभ्या असणाऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमण घडवू शकतात, असं या अभ्यासातून स्पष्ट झालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mask