मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मुलीने सांगितलं नीना गुप्ताचं दुःख; जन्माच्या वेळी जवळ होते फक्त 2 हजार रुपये

मुलीने सांगितलं नीना गुप्ताचं दुःख; जन्माच्या वेळी जवळ होते फक्त 2 हजार रुपये

Neena Gupta Autobiography: नीना गुप्तांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रातला काही भाग मुलगी मसाबाने शेअर केला आहे.

Neena Gupta Autobiography: नीना गुप्तांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रातला काही भाग मुलगी मसाबाने शेअर केला आहे.

Neena Gupta Autobiography: नीना गुप्तांच्या लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या आत्मचरित्रातला काही भाग मुलगी मसाबाने शेअर केला आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 27 मे : बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचं आत्मचरित्र लिहिलेलं लवकरच प्रकाशित होणार आहे. ‘सच कहूँ तो’ (Sach Kahu To) असं या पुस्तकाचं नाव आहे. त्यातील काही ओळी मसाबाने (Masaba Gupta) म्हणजेच नीना यांच्या मुलीने सोशल मीडिया शेअर केल्या आहेत. आपल्या जन्मावेळी आईची परिस्थिती कठीण झाली असल्याचही तिने या ओळींतून मांडलं आहे.

मसाबा बॉलिवूडची प्रसिद्ध डिझायनर आहे. तिने भावनिक होत पोस्ट शेअर केली आहे. ती लिहिते, ‘जेव्हा माझा जन्म होणार होता तेव्हा माझ्या आईच्या खात्यात केवळ 2 हजार रुपये शिल्लक होते. त्यावेळी टॅक्स रिबर्स्टमेंट मुळे 12 हजार रुपये झाले आणि मी सी सेक्शनने (C section) जन्म घेऊ शकले. मला माझ्या आईचं आत्मचरित्र वाचून तिच्या कठीण काळाविषयी समजलं. मी रोज कठोर मेहनत घेते जेणेकरून आईने मला या जगात आणण्यासाठी घेतलेली मेहनत व्याजासहित परत करू शकेन.’

View this post on Instagram

A post shared by Masaba (@masabagupta)

याशिवाय नीना गुप्ता यांनी देखिल एक पोस्ट लिहिली आहे. त्या लिहीतात, ‘माझ्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती आणि मी चिंतेत होते. कारण माझ्या खात्यात केवळ 2 हजार रुपये होते. ऑपरेशनची वेळ आली असती, तर ते शक्यच नव्हतं. मी केवळ नॅचरल बर्थच देऊ शकत होते. कारण सी सेक्शन झालं तर कठीण होणार होतं.  त्यासाठी 10 हजारांची गरज होती. सुदैवाने टॅक्स रिबर्स्टमेंटचे पैसे परत आले आणि माझं काम झालं.’

शाहरुखचा मुलगा अबराम झाला 8 वर्षांचा; पाहा त्याचे Cute Photos

नीना यांचं वेस्ट इंडीज क्रिकेटर विविअन रिचर्ड (Vivian Richard) याच्याशी 80 च्या दशकात प्रेमसंबंध होते. मसाबा ही त्यांची लव चाईल्ड आहे. नीना कुमारी माता होत्या. त्यांनी विवशी लग्न केलं नाही. कारण तो विवाहित होता. तेव्हा नीना यांनी एकटीनेच मसाबाला (single mother) सांभाळण्याचा निर्णय घेतला. मसाबाने एका मुलाखतीत सांगितलं की ती आपले आई- बाबा दोघांवरही प्रेम करते. तिने काही काळ वडिलांसोबतही घालवला असल्याचं ती म्हटली होती.

First published:

Tags: Bollywood, Entertainment