Home /News /lifestyle /

मंगळाच्या ध्रुवावर सापडला मोठा तलाव! जीवसृष्टीची शक्यता बळावली

मंगळाच्या ध्रुवावर सापडला मोठा तलाव! जीवसृष्टीची शक्यता बळावली

मंगळाच्या जमिनीखाली 3 मोठे जलाशय सापडले आहेत. संशोधकांनी लावलेल्या शोधांमुळे मंगळावर जीवसृष्टी असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते.

    लंडन, 1 ऑक्टोबर : The European Space Agency (ESA) ला यापूर्वी मंगळ मिशन मार्स एक्सप्रेसला तिथल्या दक्षिण ध्रुवावर काही जलाशयांचं अस्तित्व आढळलं आहे. Advanced Radar for Subsurface and Ionosphere Sounding (MARSIS) या उपकरणाद्वारे हे शोधकाम करण्यात आलं होतं. या संशोधनामुळेच मंगळावर पाणी असल्याचा दावा पुन्हा एकदा करण्यात आला आहे. मंगळावर पाण्याचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा  काही पहिल्यांदा करण्यात आलेला नाही. याआधीही अनेकदा तसं घडलंय. ESA ने यापूर्वी 2018 मध्ये बर्फाखाली  पाण्याच्या तलावाचं अस्तित्व आढळलं होतं. परंतु ते सिद्ध करण्यासाठी तसे पुरावे शास्रज्ञांना दाखवता आले नव्हते त्यामुळेच ते साशंक होते; म्हणून 2012 ते 2015 मध्ये सॅटेलाईटने 29 वेळा फिरून त्यावेळी काढलेले फोटो आहेत. त्या फोटोंमध्ये तलावसदृश जागा दिसल्या  आहेत. मंगळावर पाणी सापडणं ही फार दुर्मिळ बाब आहे. मंगळ हा ग्रह कोरडा किंवा दुष्काळी भाग नाही. त्यामुळे तिथे तरल प्रमाणात का होईना पण पाणी आहे हे आधी केलेल्या संशोधनात सिद्ध झालं आहे. तसंच संशोधकांनी लावलेल्या शोधांमुळे मंगळावर  जीवसृष्टी असल्याची शक्यताही व्यक्त केली जाते. मंगळावर पाठवण्यात आलेल्या रोबोला ३ अब्ज वर्षांपूर्वीच्या काही जुने कार्बनिक अणू सापडले होते. त्यावरून जीवसृष्टीचं अस्तित्व तिथं असू शकतं असा अंदाज शास्रज्ञांनी वर्तवला होता. (ESA)च्या सॅटेलाईटमुळे मंगळावर कोणत्या भागात ओलावा आहे हे समजण्यात मोठं यश मिळालं आहे.  जीवसृष्टी अस्तित्वात राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ते पाणी मंगळ ग्रहावर सापडल्याचा दावा केला जात आहे.  तिथल्या जमिनीखाली 3 तलाव सापडले आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा इथे आढळून आला आहे. त्यामुळे मंगळावर मानवी जीवन जगणं कठीण होणार नाही. हे एकंदरीत या संशोधनामुळे स्पष्ट होत आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Space

    पुढील बातम्या