लग्न झालंय? मग निश्चिंत रहा, हा आजार कधीच होणार नाही!

लग्न झालंय? मग निश्चिंत रहा, हा आजार कधीच होणार नाही!

रोजच्या दिनक्रमातील अनेक गोष्टी विसरण्यात या आजाराची लक्षणं स्पष्ट दिसून येतात.

  • Share this:

एका संशोधनात हे दिसून आलं की, लोकांमध्ये वय वाढल्यानंतर डिमेन्शिया अर्थात स्मृतीभंश हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तर लग्न झालेल्यापेक्षा घटस्फोट झालेल्यांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, घटस्फोटी महिलांपेक्षा घटस्फोटी पुरुषांमध्ये स्मृतीभंश हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

मिशिगन स्टेट यूनिवर्सिटीचे शिक्षक हुई लियू म्हणाले की, 'अमेरिकेत अविवाहित वृद्धांची संख्या सतत वाढत आहे. अशावेळी हा शोध फार महत्त्वपूर्ण आहे. लग्नात काही वर्षांनंतर अनेक समस्या येतात. पण या सगळ्यात डायमेन्शियाच्या आजारात लग्न होणं ही सकारात्मकता मानली जाते.'

'द जर्नल ऑफ जेरोन्टोलॉजी'मध्ये प्रदर्शित झालेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी 2000 ते 2014 मध्ये आरोग्य आणि सेवानिवृत्तीच्या अभ्यासातून काही माहिती गोळा केली. संशोधकांनी 52 वर्ष आणि त्याहून जास्त वयोगटातील 15 हजार लोकांवर रिसर्च केला. दर दोन वर्षांनी त्यांना या संशोधनाशी निगडीच काही प्रश्न विचारण्यात आले. सर्व लोकांना लग्न झालेले, घटस्फोटी, वेगळे राहत असलेले, लग्न न केलेले आणि लग्न झालेले अशा चार प्रकारात विभागण्यात आले. या सर्वांमध्ये लग्न झालेल्यांमध्ये डिमेन्शियाचा धोका सर्वात कमी जाणवला.

डिमेन्शिया हा काही विशिष्ट आजार नसून अशी काही लक्षणं आहेत ज्यामुळे गोष्टी लक्षात राहत नाहीत. (Memory Loss) रोजच्या दिनक्रमातील अनेक गोष्टी विसरण्यात या आजाराची लक्षणं स्पष्ट दिसून येतात. स्मृतीभ्रंशचे अनेक प्रकार असतात. पण त्यातही 60 ते 80 टक्के रुग्ण हे अल्जायमर आजाराने त्रस्त असतात.

निष्काळजीपणाचा कळस!डॉक्टरांची मोठी चूक,सहाव्या महिन्यात भंगलं आई होण्याचं स्वप्न

ऑफिसच्या AC मुळे शरिरातील या भागांचं होतं नुकसान; अशी घ्या काळजी!

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

आयुर्वेदानुसार जाणून घ्या जेवणात कसं, कधी आणि काय खावं...

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 09:33 PM IST

ताज्या बातम्या