लंडन, 23 जून : जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला लग्न झालं की मूल होतं, असंच वाटतं. ते कसं होतं, याची कल्पना आपल्याला बालवयात नसते. मात्र एखाद्या व्यक्तीला मोठेपणीही असंच वाटतं असं तुम्हाला सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. अशी व्यक्ती असूच शकत नाही की जिला मूल कसं होतं हे माहिती नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही मात्र अशा व्यक्तीही आहेत. एका नर्सने अशा जोडप्याबाबतचा आपला अनुभव सांगितला आहे.
नर्स रिशेल हिअरसन (Rachael Hearson) या यूकेतल्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये (National Health Service - NHS) काम करत होत्या. त्यांनी कित्येक दशकं मिड वाइफ आणि नर्स म्हणून भूमिका बजावली आणि या भूमिका बजावतानाचा आपला संपूर्ण अनुभव त्यांनी हँडल विथ केअर - कॉन्फेशन ऑफ अॅन एनएचएस हेल्थ व्हिझिटर या पुस्तकात मांडला आहे. याबाबत त्यांनी मिररला मुलाखत दिली. ज्या मुलाखतीत त्यांनी असा अनुभव सांगितला ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
हे वाचा - OMG! शरीर की रबर? YOGA POSES पाहून तुम्हीही व्हाल थक्क
रिशेल यांनी सांगितलं, एकदा त्या अशा जोडप्याला भेटल्या ज्यांचं लग्न होऊ बरीच वर्ष झाली होती मात्र त्यांना मूल नव्हतं. मूल होण्यासाठी सेक्स करावा लागतो हे या दापम्याला माहिती नव्हतं. लग्न झाल्यावर मूलं होतात आणि आपण लग्न केलं म्हणजे आता आपल्याला मूल होणार असंच त्यांना वाटत होतं. डॉक्टरांनी रिशेल यांना ही माहिती दिली होती. रिशेल यांनी मग त्या जोडप्याशी संवाद साधला, त्यांना सेक्सबाबत माहिती दिली आणि बाळ कसं होतं हे समजावलं.
ही फक्त एक गोष्ट झाली, असे बरेच अनुभव हिअरसन यांनी आपल्या पुस्तकात मांडलेत.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Relationship