अनुराग कश्यपच्या पाठिशी मराठमोळ्या अभिनेत्री; फेटाळून लावला लैंगिक छळाचा आरोप

अनुराग कश्यपच्या पाठिशी मराठमोळ्या अभिनेत्री; फेटाळून लावला लैंगिक छळाचा आरोप

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) लैंगिक छळाचा आरोप लावताच मराठी अभिनेत्री (marathi actress) त्याच्यासाठी धावून आल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : अभिनेत्री पायल घोषने (payal ghosh) दिग्दर्शक अनुराग कश्यपवर (anurag kashyap) लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला. 2014 साली अनुराग कश्यपने आपल्यावर जबरदस्ती केल्याचं पायलने सांगितलं. इतक्या वर्षांनंतर पायल घोष व्यक्त झाली. मात्र अभिनेत्री कंगना रणौत सोडता बहुतेक अभिनेत्रींनी अनुराग कश्यपला पाठिंबा दिला आहे. अगदी मराठमोठ्या अभिनेत्रींनीही (marthi actress) अनुराग कश्यपचं समर्थन केलं आहे.

बॉलिवूडचा दिग्दर्शक असलेल्या अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप होताच फक्त हिंदी अभिनेत्री नाही तर मराठी अभिनेत्रीही धावून आल्या आहेत. अभिनेत्री अमृता सुभाष (amruta subhash) आणि राधिका आपटे (radhika apte) दोघीही अनुरागच्या पाछिशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. दोघींनीही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

राधिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर अनुरासह एक फोटो शेअर केला आहे आणि अनुरागबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

राधिका म्हणाली, "अनुराग कश्यप तुम्ही माझ्या सर्वात जवळ असलेल्या मित्रांपैकी एक आहात. तुम्ही नेहमी मला प्रेरित केलं आणि मला आधार दिला. आपलं एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि सन्मान याचा मला आदर आहे. मी जेव्हापासून तुम्हाला ओळखते. तेव्हापासून तुमच्यासोबत मला नेहमी सुरक्षित वाटतं. तुम्ही माझे विश्वासू मित्र आहात आणि कायम राहणार"

तर मराठी अभिनेत्री अमृता सुभाषने अनुरागबाबत ट्वीट केलं आहे. अमृता म्हणाली, "तू अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहेस. तू नेहमीच मला आणि सेटवरील प्रत्येकाला आदरानं वागवलं आहेस. मी कधीच शब्दात तुला हे सांगितलं नाही. कारण मला कधीच त्याची गरज वाटली नाही. मात्र आज मला तुझे आभार मानायचे आहे. तू मला दिलेल्या आदरासाठी खूप धन्यवाद"

हे वाचा - अनुराग कश्यप नेमका कसा आहे? EX WIFE कल्की कोचलिनने सर्वांसमोर आणलं खरं रूप

अनुरागची एक्स वाइफ अभिनेत्री कल्की कोचलिननेदेखील (Kalki Koechlin) यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या एक्स पतीवर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर कल्की कोचलिनही व्यक्त झाली आहे. सोशल मीडियावर तिनं भली मोठी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं अनुराग कश्यप नेमका कसा आहे, हे सांगितलं आहे. तसंच अशा परिस्थिती त्याला पाठिंबा देत तिनं त्याला मजबूत राहण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचा -"अनुराग कश्यप माझ्यासमोर न्यूड झाला आणि...", पायल घोषने केला 'त्या' घटनेचा उलगडा

तर अभिनेत्री कंगना रणौतने मात्र या पायल घोषचं समर्थन केलं आहे. अनुराग कश्यपबाबत बोलताना कंगनाने ट्वीट केलं आहे, "पायल घोषने जे काही सांगितलं, तसं अनुराग करू शकतो. त्याने आपल्या सर्वच जोडीदारांना फसवलं आहे. तो मोनोगॅमस नाही हे त्याने स्वत:च स्वीकार केलं आहे. अनुरागने पायलसह जे काही केलं, ते बुलिवूडमध्ये सर्रासपणे होतं. स्ट्रगल करणाऱ्या आऊटसायडर मुलींना ते एखाद्या सेक्स वर्करसारखी वागणूक देतात. जे पायलने सांगितलं, तसं माझ्यासह अनेक बड्या अभिनेत्यांनी केलं आहे"

Published by: Priya Lad
First published: September 21, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या