Home /News /lifestyle /

Skin care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

Skin care : चेहरा स्वच्छ करताना अनेकजण या चुका करतात; नंतर उपायांवर वेळ घालवतात

त्वचेवरील डागांसारख्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी, लोक वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. तर यासाठी अनेक लोक विविध प्रकारच्या सौंदर्य उपचारांची मदतही घेतात. पण,

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : चेहरा स्वच्छ करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते, परंतु असे असतानाही अनेक वेळा लोक अशा चुका करतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. जाणून घ्या चेहरा साफ करताना अनेकदा लोक ज्या चुका करतात, त्या तुम्हीही (Cleaning face Tips) करत नाही ना. खूप गरम आणि थंड पाणी : पाणी कसे आहे याची चेहरा धुताना लोक अजिबात काळजी घेत नाहीत. ऋतूनुसार चेहरा धुताना काळजी घ्यावी लागते. म्हणजे थंडी असेल तर जास्त गरम पाणी वापरावे आणि गरम होत असेल तर थंड पाणी वापरावे. असे न झाल्यास यामुळे छिद्र साफ होत नाहीत आणि ते पिंपल्सचे कारण ठरते. चेहरा घासणे : चेहरा धुतल्यानंतर अनेकजण टॉवेलने घासण्याची मोठी चूक करतात. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा लालसरपणा येतो. इतकेच नाही तर हे कारण त्वचेवर पिंपल्स येण्यासाठीही कारणीभूत ठरते. साबणाचा वापर : चेहरा स्वच्छ करण्यासाठी नेहमी फेस वॉशचा वापर करायला हवा. अनेकांना हे माहीत असूनही लोक घाईत चेहरा साबणाने स्वच्छ करण्याची चूक करतात. त्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. हे वाचा - तुमच्याकडे पॅनकार्ड असल्यास वाचवू शकता 1000 रुपये, फक्त एक काम करावं लागेल? तोच टॉवेल : ही चूक अनेक लोकांकडून होत असते. अंग पुसण्यासाठी वापरत असलेला टॉवेलच चेहरा पुसण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शरीरातील घाण चेहऱ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे अनेकांना चेहऱ्यावर मुरुमे, पुरळ यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हे वाचा - Price Hike: एसी, फ्रीज महागणार, मार्चदरम्यान 10 टक्क्यांपर्यंत वाढणार इलेक्ट्रॉनिक्सच्या किमती मेकअपसह चेहरा धुणे : मेकअपसह चेहरा धुण्याची चूक करू नये हे फार कमी लोकांना माहीत असेल. फेसवॉशने चेहऱ्यावरील मेकअप काढताना चेहऱ्यावर थोडासा मेकअप राहतो आणि त्यात केमिकल असते. त्यामुळे ही चूक करणे टाळा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Skin, Skin care

    पुढील बातम्या