इम्फाळ, 10 नोव्हेंबर : अनेकदा आपण पडलो, आपल्याला छोटीशी दुखापत झाली तरी आपण साधी दैनंदिन कार्यही करत नाहीत. ती दुखापत बरी होईपर्यंत आराम करतो. विचार करा एखाद्याच्या आयुष्यात असं दुखणं किंवा व्यंग कायमचं असेल तर... तर काय याचं उत्तर दिलं आहे ते एका छोट्याशा चिमुरड्यानं. ज्याला फुटबॉल (football) खेळण्याची आवड पण एक पाय नाही. पण तरी त्यामुळे तो खचला नाही तर एका पायावर तो फुटबॉल खेळतो.
मणिपूरच्या (manipur) इम्फाळमध्ये (Imphal) राहणारा कुणाल श्रेष्ठा (Kunal Shrestha). कुणाल इयत्ता चौथीत शिकतो. जन्मापासूनच त्याला एक पाय नाही. पण तरी त्याला फुटबॉल खेळायची आवड. फुटबॉल जो पायानंच खेळला जातो. त्यात कुणालला एक पाय नाही. कसं बरा तो फुटबॉल खेळेल. बिचारा... त्याला आवड असूनही तो फुटबॉल खेळू शकत नाही. आपल्या प्रत्येकाच्या मनात असाच विचार येईल. कुणालला पाहून आपल्या प्रत्येकाला असंच वाटेल. मात्र आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट कुणालनं मात्र शक्य करून दाखवली.
#WATCH: Kunal Shrestha, a Class 4 student from Imphal plays football with a single limb. #Manipur
"My son was born without a limb. I vowed to never let him feel different from his peers. He never exhibited low esteem. He learned to ride a bicycle on his own", says Kunal’s mother pic.twitter.com/NTzyOWhX4e
ज्या कुणालला एक पाय नाही तो फुटबॉल खेळतो. कुणालचा हा व्हिडीओ एएनआयने ट्वीट केला आहे. ज्यामध्ये कुणाल इतर मुलांसह फुटबॉल खेळताना दिसतो आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
तसं पाहायला गेलं तर कुणालसाठीहीदेखली हे सोपं नव्हतं. त्याला बऱ्याच अडचणी, समस्या उद्भवतात. मात्र त्यावर तो मात करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शारीरिक व्यंगला तो आपल्या स्वप्नांवर, आपल्या आवडींवर, आपल्या इच्छांवर भारी पडू देत नाही. एएनआयशी बोलताना कुणाल म्हणाला, मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं. तोल सावरताना थोडी अडचण येते. सुरुवातीला जेव्हा मी फुटबॉल खेळायला गेलो तेव्हा थोडी भीती वाटली मात्र आता माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझे मित्रही मला खूप प्रोत्साहीत करतात. लवकरच मी गोलही करेन.
कुणालची जिद्द तर आहेच पण त्याच्या या जिद्दीला जोड आहे ती त्याच्या आईवडीलांच्या साथीची, त्यांच्या आशीर्वादाची. कुणालच्या आईवडिलांनी त्याला कधीच अपंग समजलं नाही, त्याला तसं कधी जाणवूही दिलं नाही. इतर मुलांशी त्याची तुलना केली नाही. उलट इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्याला वागवलं. त्यामुळे साहजिकच कुणालमध्येही आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपल्यात शारीरिक कमी आहे, आपण हे करू शकत नाही ते करू शकत नाही असं त्याला कधीच वाटलं नाही. सर्वसामान्य मुलांमध्येच तो वावरू लागला. ती मुलं जे जे काही करत होती, ते ते सर्व तो करण्याचा प्रयत्न करू लागला.
एएनआयशी बोलताना कुणालच्या आईनं सांगितलं, माझा मुलगा एका पायाशिवाय जन्माला आहे. तेव्हाच मी शपथ घेतली की त्याला त्याच्याच वयाच्या मुलांप्रमाणे ठेवणार म्हणजे त्याच्यामध्ये शारीरिक व्यंग आहे, याची जाणीवही त्याला होता कामा नये. त्यानं स्वतलाही कधीच कुणापेक्षा कमी समजलं नाही. आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, असं त्यालाही कधीच वाटलं नाही. सायकलही तो स्वत:च चालवायला शिकला.