फळांचा राजा लज्जतदार आणि आरोग्यदायी

फळांचा राजा लज्जतदार आणि आरोग्यदायी

जितका चवीला गोड तितकाच औषधी गुणधर्मांसाठी उपयुक्त असलेला आंबा शरीरासाठी कितपत फायदेशीर ठरतो ते आपण पाहूयात

  • Share this:

18 एप्रिल : हापूस आंब्याची लज्जत न्यारी, एकदाच खाल्ला पण किमतीला भारी. अशीच काहीशी ख्याती असलेला फळांचा राजा आंबा एप्रिल आणि मे महिन्याच्या सुट्टीच्या काळात अगदी मनसोक्त खायला मिळतो. जितका चवीला गोड तितकाच औषधी गुणधर्मांसाठी उपयुक्त असलेला आंबा शरीरासाठी कितपत फायदेशीर ठरतो ते आपण पाहूयात..

1. त्वचेवरील रोग आणि पचनक्रिया सुरळीत व्हावी यासाठी आंबा फार फायदेशीर ठरतो. तसंच त्यातील 'अ' जीवनसत्वामुळे रातआंधळेपणा नाहीसा होण्यास मदत होते. डोळ्यांची होणारी जळजळ आणि डोळ्यांना येणारी खाजसुद्धा आंब्यामुळे कमी होते.

2. कैरी थंड असल्याने कैरीच्या पन्ह्याचे सेवन केल्यास उन्हाळ्यात वाढत्या गरमीमुळे येणारा अशक्तपणा कमी होतो. मीठ लावून कैरी खाल्याने तहानेने पडणारा शोषसुद्धा कमी होण्यास मदत होते.

3. कैरीच्या थंडपणामुळे शरीरातील पित्ताच्या तक्रारींवरही मात करता येते. कैरीमुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कैरीमधील ' क ' जीवनसत्त्वामुळे रक्तातील दोषांवर ती फारच गुणकारी ठरते.

4. आंबा हा सर्वगुणकारी आहेच, त्याचप्रमाणे त्याच्या पानांचाही औषध म्हणून उपयोग होतो. आंब्याची कोवळी पाने मधुमेहावर खूपच गुणकारी आहे. आंब्याची पानं घशाच्या विकारांवरही फारच उपयुक्त ठरतात.

5. आंब्यामुळे वजन वाढतं. स्फूर्ती येते. बारीक माणसांना वजन वाढवण्यासाठी आंबा उपयोगी आहे.

First published: April 18, 2017, 2:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading