S M L

आंब्याच्या सेवनानं वाढते स्मरणशक्ती!

आंब्याचा स्वाद तर सगळ्या फळांपेक्षा अव्वल असतोच. पण आंब्याचे उपयोगही खूप आहेत. आंब्यात खूप पोषक घटकही आहेत.

Sonali Deshpande | Updated On: May 10, 2018 02:20 PM IST

आंब्याच्या सेवनानं वाढते स्मरणशक्ती!

10 मे : सध्या आंब्यांचा मोसम आहे. आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. आणि खरंच आहे हे. आंब्याचा स्वाद तर सगळ्या फळांपेक्षा अव्वल असतोच. पण आंब्याचे उपयोगही खूप आहेत. आंब्यात खूप पोषक घटकही आहेत. टाकू या एक नजर -

1. आंब्यात ए व्हिटॅमिन भरपूर असतं. उन्हाळ्यात डोळ्यांसाठी ते एकदम उपयोगी असतं.

2. आंब्यात अँटिआॅक्सिडंट खूप असतात. त्यामुळे कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो.

3. आंबा खाल्ल्यानं थकावट दूर होते.

4. यात सी व्हिटॅमिन भरपूर असतं. आंब्यानं त्वचा तजेलदार राहते.

Loading...
Loading...

5. फायबर आणि कॅलरीज खूप असल्यानं आंबा खाल्ल्यानं पोटातलं इन्फेक्शन दूर होतं.

6. आंब्यात ग्लुटामिन असतं. त्यामुळे स्मरणशक्ती वाढते.

7. आंब्यात शुगर भरपूर असते. त्यामुळे तो प्रमाणात खायला हवा.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 10, 2018 02:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close