मालिकांपाठोपाठ फिल्मच्या सेटवरही कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी झाली अवस्था

मालिकांपाठोपाठ फिल्मच्या सेटवरही कोरोना; 2 अभिनेते पॉझिटिव्ह, अर्जुन रामपालची अशी झाली अवस्था

'नेल पॉलिश'चं (nailpolish) शूटिंग सुरू असताना दोन अभिनेत्यांना कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली. अभिनेता अर्जुन रामपालही (arjun rampal) होम क्वारंटाइन झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : फिल्म, मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू करणं आता चांगलंच महागात पडू लागलं आहे. काही मालिकांनंतर आता फिल्मच्या सेटवरही कोरोना पोहोचला आहे. नेल पॉलिश फिल्मच्या शूटिंगदरम्यान दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अर्जुन रामपालही (arjun rampal) होम क्वारंटाइन झाला आहे.

नेल पॉलिश (nailpolish) सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकाच वेळी दोन अभिनेत्यांना कोरोना झाला आहे. अभिनेता अर्जुन रामपालने आपल्या ट्वीटवर अकाऊंटर एक पोस्ट केली आहे. अर्जुनने आपला घरातील फोटो शेअर करत. आपल्या दोन सह अभिनेत्यांना कोरोना संक्रमण झाल्याचं सांगितलं आहे. मानव कौल (manav kaul) आणि आनंद तिवारीला (anand tewari) कोरोना झाला आहे.

अर्जुन रामपाल म्हणाला, नेल पॉलिशच्या सेटवर मानव कौल आणि आनंद तिवार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं. प्रोडक्शननं फिल्मचं शूटिंग तात्काळ थांबवलं आहे आणि सर्व जण आता आराम करत आहे. मी माझ्या घरातच क्वारंटाइन आहे. आता माझ्या रिपोर्टची प्रतीक्षा करतो आहे. सर्वांपासून दूर राहत आहे.

मराठी मालिकांच्या कलाकारांना कोरोना

आई माझी काळूबाई आणि अग्गंबाई सासूबाई मालिकेतल्या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली. आई माझी काळूबाई 27 जणांना कोरोनाची झाला. या मालिकेतील अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर अग्गंबाई सासूबाई मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांनाही कोरोना झाल्याची माहिती मिळते आहे. निवेदिता यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केल्याचं समजतं आहे. निवेदिता यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजताच मालिकेच्या सेटवरील सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. इतर कलाकारांचीही चाचणी झाली. या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारे डॉ. गिरीश ओक, आशुतोष पत्की, तेजश्री प्रधान यांचाही कोरोना रिपोर्ट आला आहे. त्यांचा अहवाल नेगेटिव्ह असल्याचं समजतं आहे.

हे वाचा - आपण यातून कधी बाहेर पडणार? कोरोना पॉझिटिव्ह होताच श्वेता तिवारीला कोसळलं रडू

कोरोनाचं संक्रमण अधिक होऊ नये. म्हणून गेले काही महिने पूर्ण लॉकडाऊन होता. मात्र हळूहळू हा लॉकडाऊन शिथील करण्यात आला. हातात काम, रोजगार नसल्याने अनेकांवर आर्थिक संकटं ओढावली. कलाकार आणि शूटिंगमध्ये काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनादेखील अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे काही अटी आणि नियमांसह शूटिंगला परवानगी देण्यात आली. सेटवरदेखील कोरोनापासून बचावासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, खबरदारी घ्यावी असा सल्ला देण्यात आला.

हे वाचा - विकी डोनर फेम अभिनेत्याचे निधन, कॅन्सरशी सुरू असणारी झुंज अखेर संपली

मात्र आता चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कोविड नियमांचं पालन न केल्यामुळेच ही घटना घडली असा आरोप मनसेच्या चित्रपट आघाडीने केला आहे. यापुढे शूटिंगदरम्यान नियमांचं पालन होत नाही असं आढळून आल्यास शूटिंग बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आघाडीचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. खोपकर यांनी मालिकांचे निर्माते आणि मनोरंजन वाहिन्यांच्या मालकांना एक पत्र लिहून हा इशारा दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: September 24, 2020, 6:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading