Home /News /lifestyle /

Atal Rohtang Tunnel : 160 वर्षांनी भारतात प्रत्यक्षात साकारला जगातील सर्वात लांब बोगदा

Atal Rohtang Tunnel : 160 वर्षांनी भारतात प्रत्यक्षात साकारला जगातील सर्वात लांब बोगदा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मनाली आणि लेहला जोडणाऱ्या अटल रोहतांग बोगद्याचं (Atal Rohtang Tunnel) उद्घाटन केलं. या बोगद्याचा इतिहासही खूप रंजक आहे.

    मनाली, 03 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज  मनाली आणि लेहला जोडणाऱ्या अटल रोहतांग बोगद्याचं  (Atal Rohtang Tunnel) उद्घाटन केलं. हा बोगदा म्हणजे केवळ बोगदा नसून हिमालयातील इतक्या उंच ठिकाणी अस्तित्वात आलेलं एक स्वप्नच आहे. लाहौल खोऱ्याला जीवनदान देणारा असा बोगदा तयार करता येऊ शकेल असा कुणी विचारही केला नसेल. आतापर्यंत थंडीचे 6 महिने होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौलच्या परिसराचा देशाशी संपर्क तुटलेला असायचा. पण आता या बोगद्यामुळे हा भाग देशाशी 12 महिने संपर्कात राहणार आहे. एवढ्या उंचीवरच्या जगातील कोणत्याही महामार्गावर इतक्या लांबीचा बोगदा अस्तित्वात नाही त्यामुळे अशा प्रकारचा हा जगातील एकमेव बोगदा आहे. या बोगद्याचा इतिहासही खूप रंजक आहे. 1860 मध्ये पाहिलं होतं स्वप्नं इंग्रजांच्या काळात 1860 साली मोरावियन मिशनरींनी रोहतांग खोऱ्यातून बोगदा काढण्याची कल्पना मांडली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1953 मध्ये बोगद्याची कल्पना रद्द करून राहलाफालपासून रोहतांग आणि कोकसरपर्यंत रोप-वे तयार करण्याची योजनाही तयार करण्यात आली होती पण ती कागदावरच राहिली. हे वाचा - चीनची झोप उडणार! PM मोदींच्या हस्ते 'अटल टनेल'चं उद्घाटन, पाहा PHOTOS या बोगद्याचं डिझाइन तयार करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्नोई माउंटेन इंजिनीअरिंगने आपल्या वेबसाइटवर असा दावा केला आहे की, 1860 मध्ये मोरावियन मिशनरींनी रोहतांगजवळ बोगदा खणण्याची कल्पना पहिल्यांदा मांडली होती. या बोगद्याचं डिझाइन घोड्याच्या नालेसारखं आहे. इंदिराजींचं स्वप्न अटलजींनी पूर्ण केलं  माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या सरकारने मनाली-लेहमध्ये वर्षभर संपर्क राहावा म्हणून रस्त्याची योजना तयार केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयींनी 2002 मध्ये रोहतांगमध्ये बोगदा तयार करणार असल्याचं जाहीर केलं. 2019 मध्ये वाजपेयींच्या नावावरच या बोगद्याचं नाव अटल बोगदा असं ठेवण्यात आलं. हे वाचा - क्षेपणास्त्रालाही चकवा देऊ शकतं PM मोदींचं खास विमान, पाहा आतले Exclusive Photos पीर पंजाल पर्वतरांगेत तयार करण्यात आलेला हा बोगदा 9.02 किलोमीटरचा असून तो लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर लागतो. हा बोगदा 10.5 मीटर रुंद आण 5.52 मीटर उंच आहे. हा बोगदा एफकॉन कंपनीने तयार केला असून, बॉर्डर रोड ऑर्गनायझेनशननेही (बीआरओ) त्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या बोगद्यात दोन लेन आहेत. समुद्रसपाटीपासून तो 10 हजार फुटांवर आहे तो इतक्या उंचीवरील जगातील सर्वांत लांब बोगदा आहे. या बोगद्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या बोगद्यातच एक सुरक्षेसाठीचा बोगदा तयार करण्यात आला असून संकटकाळी त्याचा उपयोग होऊ शकतो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Atal bihari vajpayee, India

    पुढील बातम्या