Lion costume घालून तो खऱ्या सिंहांसमोर गेला आणि... काय झालं पाहा VIDEO

Lion costume घालून तो खऱ्या सिंहांसमोर गेला आणि... काय झालं पाहा VIDEO

माणूस म्हणून नाही तर सिंह (Lion) बनवून व्यक्ती खऱ्या सिंहांसमोर गेला तेव्हा या सिंहांनी नेमकं काय केलं ते पाहा.

  • Share this:

टोकियो, 13 जानेवारी : खऱ्या सिंहासमोर जाण्याची तशी डेअरिंग कुणीच करणार नाही. खरंतर या कल्पनेनंच घाम फुटतो. पण एक व्यक्ती सिंहासमोर एक माणूस म्हणून नाही तर सिंह बनून गेली. म्हणजे त्या व्यक्तीनं सिंहासारखा पोशाख घातला. नकली सिंह बनवला आणि खऱ्या सिंहासमोर जाऊन तो उभा राहिला. त्यांच्यासमोरच फिरू लागला. समोर अशा सिंहाला पाहताच खऱ्या सिंहांनी काय केलं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जपानच्या प्राणीसंग्रहायलातील हा व्हिडीओ आहे. जिथं लायन एस्केप ड्रिल (lion escape drill) केलं जातं होतं. हे ड्रील खऱ्या सिंहासोबत करणं म्हणजे एक आव्हानच होतं. त्यामुळे एक व्यक्तीच स्वतः सिंह बनला. या व्यक्तीनं सिंहाचा पोशाख घातला आणि सिंहाप्रमाणे प्राणीसंग्रहालयात फिरू लागला.  हे ड्रिल सुरू होतं तेव्हा तिथं दोन खरे सिंहही होते. ते या सिंहाला आपल्या डोळ्यांनी पाहत होतं. तिथं जे काही सुरू होतं ते सर्व सिंहांनी पाहिलं. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव काय होते ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

तसा हा व्हिडीओ जुना आहे. ट्विटर युझर @Johnny_suputama यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 22 जून 2019 ला त्यांनी हा व्हिडीओ  आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडीओ पोस्ट करताना दिलेल्या माहितीनुसार Aichi मधील Tobe प्राणीसंग्रहायलातील हे लायन एस्केप ड्रील आहे. या व्हिडीओत खऱ्या सिंहाच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच.

हे वाचा - गर्लफ्रेंडला चॉकलेट अन् Teddy देण्यासाठी सलमानने गाठलं बंगळुरू पण...

व्हिडीओ पाहू शकता लायन कॉस्ट्युम घातलेली ही व्यक्ती प्राणीसंग्रहायलात एखाद्या सिंहाप्रमाणे फिरते आहे. प्राणीसंग्रहायलातील कर्मचारीही तिथं आहेत. याच सिंहाला खरा सिंह मानून ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. सिंह पळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही कर्मचारी त्याला जाळी धरून अडवण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तिथं एक गाडी येते आणि गाडीतील एक व्यक्ती सिंहाला बेशुद्ध करते. सिंहाचं रूप घेतलेला व्यक्तीही जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाल्याचा अभिनय करतो. त्यानंतर सर्व कर्मचारी एकत्र येत त्या सिंहाला जाळीत गुंडाळतात आणि त्याला तिथून घेऊन जातात.

हे वाचा - समुद्री जीवाच्या पाठीवर TRUMP लिहिणारा कोण? शोधणाऱ्याला मिळणार 3 लाख

व्हिडीओ पाहिल्यानंतर खऱ्या सिंहांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. ते अगदी स्तब्ध झालेले दिसत आहेत.

Published by: Priya Lad
First published: January 13, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading