Home /News /lifestyle /

पांढरेशुभ्र, चकचकीत दिसावेत म्हणून चक्क VIM BAR ने घासले दात; तोंडाची अवस्था पाहून डॉक्टरही झाले Shocked

पांढरेशुभ्र, चकचकीत दिसावेत म्हणून चक्क VIM BAR ने घासले दात; तोंडाची अवस्था पाहून डॉक्टरही झाले Shocked

पांढरेशुभ्र आणि चमकदार दातांची या व्यक्तीला चांगलीच किंमत मोजावी लागली.

    मुंबई,  10 सप्टेंबर : आपले दात पांढरेशुभ्र, चकचकीत असावेत असं प्रत्येकाला वाटतं (Healthy teeth). दात (Teeth problem) पिवळे दिसू लागले की दातांचा हा पिवळेपणा (Pale Teeth) दूर करण्यासाठी आपण काय काय नाही करत. सामान्यपणे दात स्वच्छ (Cleaning teeth) करण्यासाठी आपण टूथपेस्ट वापरतो. शिवाय काही घरगुती उपायही करतो. पण एका व्यक्तीने तर हद्दच केली (Oral health). तो दात साफ (Oral care) करण्यासाठी चक्क वीम बार लावतो (Teeth Washed With Vim Bar). मॅनचेस्टरमधील 74 वर्षांचे डॉ. बर्नार्ड लेस्टर (Dr Bernard Lester)  यांनी आपल्या नव्या पुस्तकात आपल्या रुग्णांच्या काही स्टोरी सांगितल्या आहेत. आपल्या करिअरमधील सर्वात विचित्र आणि मजेशीर केसबद्दल सांगितलं आहे. डॉ. बर्नार्ड यांनी सांगितलं की, एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये एक रुग्ण आला. ज्याचे दात पांढरेशुभ्र होते. सामान्यपणे असे दात खूप कमी पाहायला मिळतात. पण जेव्हा त्याने तोंड उघडलं, तेव्हा जे दिसलं ते पाहून मला धक्काच बसला.  त्याचे दात चमकदार होते पण त्याच्या हिरड्या पूर्णपणे खराब झाल्या होत्या आणि तोंड अल्सरने भरलं होतं. हे वाचा - Shocking! छातीचा झाला दगड, फुगू लागले ब्रेस्ट; सर्जरीनंतर महिलेची भयंकर अवस्था बर्नार्ड यांनी व्यक्तीला याचं कारण विचारलं तेव्हा त्या व्यक्तीने आपण आपले दात विम बारने साफ करत असल्याचं सांगितलं. विम बारने दात स्वच्छ केल्याने त्याचे दात पांढरेशुभ्र होते. पण या साबणात ब्लीचिंग पावडर असतं, जे भांड्यांचा चिकटपणा दूर करतं. जेव्हा हा साबण दातांवर लावण्यात आला तेव्हा दात पांढेर झाले पण ब्लीचिंग पावडरमुळे हिरड्या खराब झाल्या, असं डॉ. बर्नाड यांनी सांगितलं. पांढरेशुभ्र आणि चमकदार दातांच्या नादात या व्यक्तीने जो प्रताप केला त्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली.  त्याला तोंडाची सर्जरी करावी लागली. हे वाचा - Shocking! मॅकडोनाल्डच्या रोलमध्ये दिसलं निपल; पाहताच हादरलेल्या तरुणाने मग... असे कितीतरी लोक माझ्याकडे येतात ज्यांना आपले दात लगेच पांढरेशुभ्र करून हवे असतात. पण खरंतर हळूहळू दात स्वच्छ करणंच चांगलं आहे. त्यासाठी नियमित ब्रश करावं, असा सल्ला त्यांनी सर्वांना दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या