VIDEO: गांधीलमाशी मारण्यासाठी त्याने वापरले फटाके, घराचं छप्पर जळालं

VIDEO: गांधीलमाशी मारण्यासाठी त्याने वापरले फटाके, घराचं छप्पर जळालं

भारतात सर्वात जास्त 'जुगाड' केले जातात असं म्हटलं जातं. पण जरा इतर देशांमध्ये पाहिलं तर अशा लोकांची संख्या काही कमी नाही.

  • Share this:

मॅसेच्युसेट्स, 19 ऑगस्ट- भारतात सर्वात जास्त 'जुगाड' केले जातात असं म्हटलं जातं. पण जरा इतर देशांमध्ये  पाहिलं तर अशा लोकांची संख्या काही कमी नाही. आपण कधीही विचार करणार नाही असे अनेक जुगाड लोक करत असतात. जर आम्ही तुम्हाला सांगितलं की गांधीलमाशीला मारण्यासाठी एकाने फटाक्यांचा वापर केला तर तुमचा विश्वास बसेल का? पण असं झालंय... स्टर्ब्रिज येथील डेव्ह स्मिडाच्या घराच्या छपरावर गांधीलमाशीनं घरटं केलं होतं. सोमवारी त्याने हे घरटं हटवण्याचा प्रयत्न केला, नेमकी त्यावेळी त्याच्या घराच्या छप्पराला आग लागली.

The Telegram आणि Gazette ने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, 21 वर्षाच्या डेव्हने सुरुवातीला पेस्टिसाइड स्प्रे, फवारणी अशा पारंपरिक पद्धतीने गांधीलमाशीचं ते घरचं पाडण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टींचा काहीच उपयोग न झाल्याने डेव्हने अखेर रोमन कँडल या फटाक्याचा उपयोग केला. यामुळे काही क्षणात गांधीलमाशीचं घरटं हवेत उडवलं गेलं. पण यामुळे त्याच्या घराचं छप्परही जळालं.

डेव्हचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डेव्हने घराच्या बाहेरून रोमन कँडल छप्पराच्या दिशेने उडवलं. स्मिडाच्या मते, फार कमी प्रमाणात घराला नुकसान झालं असून छप्पराचा काहीसा भाग थोडासाच जळाला.

या देशात एकही गुन्हेगार नाही, ओस पडलेत जेल

फक्त 3 ते 4 हजारांमध्ये फिरू शकता या जागा

घरात या दिशेला असाव्यात खिडक्या, नाही तर होऊ शकतं नुकसान!

VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

Published by: Madhura Nerurkar
First published: August 19, 2019, 3:48 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading